शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मैदानातील कार्यक्रमांमुळे आठवडे बाजार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:15 IST

अपघाताचा धोका; नियोजनाबाबत महापालिका उदासीन

नवी मुंबई : शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, यासाठी शासनाने शहरांमध्ये शेतकरी आठवडे बाजार सुरू केले आहेत. महापालिकेकडून आठवडे बाजार भरणारी मैदाने विविध खासगी कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येत असल्याने रस्त्यावर आठवडे बाजार भरू लागले आहेत. महापालिकेच्या उदासीन नियोजनामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका बळावला आहे.महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने राज्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट शहरात विक्री करता यावा यासाठी शहरात आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कृषी पणन मंडळाकडून शेतकºयांना शहरात विविध ठिकाणी संपूर्ण आठवडा व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. याला अनुसरून नवी मुंबई शहरातदेखील शेतकºयांना विविध ठिकाणी मैदाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शेतकºयांनी आपले गट आणि कंपन्या बनवून या उपक्रमात सहभाग घेतला आहे. नवी मुंबई शहरात सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शेतकरी आठवडे बाजाराला देण्यात आलेली मैदाने महापालिका खासगी कार्यक्रमासाठी देखील भाड्याने देत आहे. कार्यक्र म संध्याकाळी असताना सकाळी असलेल्या आठवडे बाजाराला मैदानांमध्ये जागा उपलब्ध होत नाही त्यामुळे रस्त्यावर आठवडे बाजार सुरू होऊ लागले आहेत.शेतकरी शेतमाल घेऊन आलेली वाहने, व्यवसायासाठी लावण्यात येणारे शेड आणि ग्राहकांची वर्दळ यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. महापालिकेचे योग्य नियोजन नसल्याने नागरिकांच्या आणि आठवडे बाजाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, मैदानावरील कार्यक्रम काळात महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.