शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कमिटी जाताच मोबाइल टॉयलेट उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:16 IST

महापालिकेचा देखावा : हागणदारीमुक्त अभियानाचा बोजवारा

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : स्वच्छ सर्वेक्षणाकरिता बाहेरून पथक येणार असल्याने कळंबोलीत झोपडपट्टीसह इतर ठिकाणी मोबाइल टॉयलेट ठेवण्यात आले होते. मात्र, पथक मागे गेल्यानंतर ते टॉयलेट उचलण्यात आले आहे. यावरून महापालिकेचा दिखावा उघडकीस आला आहे. त्याचबरोबर हागणदारीमुक्त अभियानाचा बोजवारा उडाला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण महापालिका हद्दीत असल्याने कळंबोली सेक्टर १३ येथील झोपडपट्टीलगत मोबाइल टॉयलेट ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर सिंग सिटी रुग्णालयाजवळील झोपड्या तोडल्या तरी तिथे मोबाइल टॉयलेट दिसून येत होते. त्याकरिता पाण्याची टाकी ठेवण्यात आली होती. मात्र, पाणी नसल्याने या टॉयलेटचा वापर होतो की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याशिवाय इतर काही ठिकाणी कमिटी येणार असल्याने मोबाइल टॉयलेट ठेवण्यात आले होते. त्याकरिता महापालिकेने एजन्सी नेमली होती. कमिटी गेल्यानंतर काही दिवसांतच या ठिकाणचे मोबाइल टॉयलेट उचलण्यात आले. यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा फक्त दिखावाच आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.गेल्या वर्षीही तीच गतगेल्या वर्षी महापालिकेने झोपडपट्टी, ट्रक पार्किंग आणि समाविष्ट गावांच्या ठिकाणी मोबाइल टॉयलेट ठेवले होते. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण असल्याने ते टॉयलेट काही दिवस तिथे ठेवण्यात आले होते. एका सामाजिक संस्थेकडून ही सेवा पुरविण्यात आली, असे पालिकेकडून सांगण्यात आले होते. मात्र, ती संस्था नेमकी कोणती याबाबत एक शब्दाची माहिती बाहेर आली नाही. कमिटी गेल्यानंतर रात्रीच हे सर्व टॉयलेट संबंधितांकडून काढून नेल्यात आले.

स्वच्छता ही नागरिकांकरिता झाली पाहिजे, कोणाला दाखविण्यापुरती ती नसावी. महापालिका कमिटी येणार असल्याने मोबाइल टॉयलेट ठेवणे हा दिखावा कशासाठी? असा आम्ही प्रश्न उपस्थित केला होता. जशी कमिटी गेली त्यानंतर टॉयलेट गायब झाले. आता थेट पुढच्या वर्षीच येथे मोबाइल टॉयलेट दिसतील.- सतीश पाटील,स्थानिक नगरसेवक, कळंबोलीझोपडपट्टीधारकांची गैरसोय होऊ नये, तसेच उघड्यावर शौचास बसू नये, यासाठी ते ठेवले होते. हे टॉयेलट भाडेतत्त्वावर घेण्यात आले होते. आता आपण येथे कायमस्वरूपी टॉयेलट राहतील, अशी व्यवस्था करणार आहोत.- प्रशांत रसाळ,अतिरिक्त आयुक्त,पनवेल महापालिका