शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

धबधबे ठरत आहेत धोकादायक; बंदी आदेशाचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:46 IST

लहान-मोठे ओहोळाचेही पर्यटकांना आकर्षण

- वैभव गायकरपनवेल : खारघर शहरातील पांडवकडा धबधब्यावर वनविभागाने प्रवेशबंदी केली आहे. मात्र परिसरातील डोंगरकडांमधून अनेक लहानमोठे धबधबे वाहत असून पर्यटकांच्या पसंतीत उतरत आहेत. त्यामुळे वीकएण्ड, सुटीच्या दिवशी याठिकाणी मोठी गर्दी होते. मात्र पांडवकड्याबरोबरच परिसरातील लहान मोठे धबधबेही पर्यटकांसाठी धोकादायक असल्याचे शनिवारी घडलेल्या घटनेत समोर आले आहे. फ्रेंडशीप डे साजरा करण्यासाठी शनिवारी सात जण गोल्फ कोर्सच्या मागील बाजूस असलेल्या धामोळे आदिवासी वाडीजवळील लहान धबधब्यावर आले होते. येथील ओढ्याचा प्रवाह वाढल्याने चार विद्यार्थीनी वाहून गेल्या.पांडवकडा धबधब्यावर बंदी असल्याने पोलीस व वनविभागाचे याठिकाणी बंदोबस्त असतो. त्यामुळे पर्यटक परिसरातील लहान मोठ्या धबधब्यांकडे आपला मोर्चा वळवतात. यामध्ये मुंबईसह उपनगरातील पर्यटकांची संख्याही मोठी असते. खारघरमधील भौगोलिक परिस्थितीची माहिती नसताना पर्यटक अतिउत्साहात दिसेल तो धबधबा, ओहोळात मौजमजेसाठी उतरतात. त्याठिकाणी पाण्याची खोली, प्रवाहाचा अंदाज येत नसल्याने दुर्घटना घडतात.पांडवकड्यावर बंदी झुगारून प्रवेश करणाऱ्या ४० पेक्षा जास्त पर्यटकांवर यापूर्वी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र कारवाईपासून सुटका व्हावी, म्हणून काही अतिउत्साही पर्यटक पांडवकडा परिसरात विविध पयार्यी मार्गाने प्रवेश करून जीव धोक्यात घालतात.खारघर शहरातील गोल्फ कोर्सच्या मागील बाजूस सिडकोने ड्रायविंग रेंज म्हणून परिसर विकसित केला आहे. खारघर टेकडीला लागून असलेला हा परिसर पांडवकडा धबधब्याला पर्याय म्हणून नव्याने प्रसिद्ध होत आहे. याच ठिकाणी असलेला एका लहान धबधब्याचे पाणी ओढ्यातून वाहत जाते. पर्यटकांची याठिकाणी गर्दी होऊ लागली आहे. शनिवारी अतिवृष्टीमुळे ओढ्याचा प्रवाह अचानक वाढला. आणि पाण्याचा अंदाज न आल्याने चौर विद्यार्थीनी बुडाल्या.खारघर शहरातील सेक्टर ५ नदीच्या शिपोरी म्हणून अशाचप्रकाराचा धोकादायक ठिकाण ठरत आहेत . रविवारी संपूर्ण खारघर शहरातील विविध लहान मोठ्या धबधब्यावर भेट देणाºया पर्यटकांची संख्या चार ते पाच हजारांवर पोहचते. पांडवकडा व परिसरात आजवर७० पेक्षा जास्त पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे वनविभागाने धबधब्यावर बंदी घातली आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेले खारघर शहारातील धबधबे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. मात्र उत्साहाच्या भरात पर्यटक सुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेत नसल्याने दुर्घटना घडत असल्याचे पहायला मिळत आहे.अतिउत्साही ४८ पर्यटकांवर गुन्हेपांडवकडा धबधब्यावर येण्यास बंदी असताना अनेक पर्यटक बंदी झुगारत आहेत. दोन आठवड्यात खारघर पोलीस ठाण्यात ४८ पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.पर्यटकांना वेळोवेळी सतर्क करण्यात येते. मात्र तरी देखील पर्यटक पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात . खारघर शहरात अनेक धोकादायक ठिकाणे असल्याने पर्यटकांनी उत्साहाच्या भरात धोकादायक ठिकाणांवर जावून जीव धोक्यात टाकू नये.- प्रदीप तिदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , खारघर पोलीस ठाणे