शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मॉल्ससह हॉटेलमध्ये पाण्याची उधळपट्टी

By admin | Updated: March 29, 2016 03:10 IST

शहरात पाणीटंचाई सुरू असतानाही हॉटेल, मॉल्स व इतर व्यावसायिकांकडून पाण्याची उधळपट्टी सुरूच आहे. अनावश्यक गोष्टींसाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे.

- नामदेव मोरे,  नवी मुंबईशहरात पाणीटंचाई सुरू असतानाही हॉटेल, मॉल्स व इतर व्यावसायिकांकडून पाण्याची उधळपट्टी सुरूच आहे. अनावश्यक गोष्टींसाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. १९९९ मध्ये व्यावसायिक वापरासाठी २५ टक्के पाण्याचा वापर होत होता. १५ वर्षांनंतरही तेवढाच वापर दाखविला जात असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याची शंकाही उपस्थित होत आहे. स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असतानाही नवी मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक राज्यातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमध्ये प्रत्येक नागरिकाला जास्त पाणी मिळत आहे. परंतु जवळपास दहा वर्षे गरजेपेक्षा जास्त पाणी वापरण्याची सवय लागल्यामुळे आता टंचाई असल्याची ओरड होत आहे. शहरातील सामान्य नागरिक पाण्याची उधळपट्टी करत नाही. महापालिकेने आवाहन करताच होळीला रंग उधळतानाही पाण्याचा वापर केला नाही. शहरात पूर्वी व आताही पाण्याची उधळपट्टी हॉटेल, मॉल्स व श्रीमंतांच्या वसाहतीमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी वापरले जात आहे. मॉल्स व हॉटेलमध्ये प्रसाधनगृह, गार्डन व इतर अनावश्यक कारणांसाठीही पिण्याचेच पाणी वापरले जात आहे. १०० सदनिका असणाऱ्या इमारतीमध्ये जेवढा पाण्याचा वापर होतो त्यापेक्षा जास्त पाणी एका मॉलमध्ये वापरले जात आहे. मोठ्या हॉटेलमध्येही अशाचप्रकारे पाण्याचा गैरवापर सुरू आहे. वास्तविक या सर्व व्यावसायिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर केला पाहिजे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते टॉयलेट, उद्यान व इतर गोष्टींसाठी वापरण्याची आवश्यकता आहे. पालिका प्रशासन शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी काही लिटर पाणी वाया घालवले तरी त्यांना नोटीस देत आहे. कारवाई करण्याचा इशारा दिला जातो. परंतु व्यावसायिकांकडून बिनधास्तपणे पाणी चोरी होत असतानाही काहीच कारवाई होत नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली जात नाही. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धरणातील पाणी साठा पुरवायचा असेल तर हॉटेल व मॉल्सच्या पाण्यामध्ये किमान पन्नास टक्के कपात केली पाहिजे. जे पाणी चोरी करत आहेत, त्यांच्यावरही कडक कारवाईची मागणी केली जात आहे.कळंबोली ब्रिजखाली तळेकळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीकपात सुरू करण्यात आली आहे, तर दुसरीकडे एमजेपीच्या जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कळंबोली ब्रिजखाली मोठा डोह साचला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गळती होऊनही एमजेपीकडून उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कळंबोली आणि नवीन पनवेल नोडला पाणीपुरवठा करण्याकरिता सिडको एमजेपीकडून पाणी विकत घेते. भोकरपाडा येथील जलशुध्दीकरण केंद्रातून या वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र एमजेपीच्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. कित्येक ठिकाणी वाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागल्याने पाण्याची गळती होते. कळंबोली स्टील मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सिडको वसाहतीत पाणी टंचाई सुरू असताना अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होत आहे. द्रुतगती महामार्गाच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. एमजेपीच्या जलवाहिन्या बदलण्याच्या कामाला विलंब होत असल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे पाणी बचत करण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे तर दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात गळती होते याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पाण्याचे आॅडिट करणे गरजेचेशहरामध्ये हॉटेल, मॉल्समधील पाण्याचे आॅडिट करण्याची गरज आहे. नक्की या ठिकाणी किती पाणी दिले जात आहे. गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर होत आहे का, चोरून नळजोडणी घेतली आहे काय याची माहिती घेणे आवश्यक आहे. मोठ्या ग्राहकांची बिले सार्वजनिक करण्यात यावीत. कोण किती पाणी वापरतो याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.