शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीसाठी खाडीत भराव!

By admin | Updated: July 6, 2016 02:32 IST

कामोठे ते खारघर नोडला जोडण्याकरिता जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता खाडीप्रवण क्षेत्रात बांध घातला जात आहे. त्यामुळे कळंबोलीतील होल्डिंग पाँडमधून येणाऱ्या

- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली

कामोठे ते खारघर नोडला जोडण्याकरिता जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता खाडीप्रवण क्षेत्रात बांध घातला जात आहे. त्यामुळे कळंबोलीतील होल्डिंग पाँडमधून येणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण होत आहे. कमी पावसातही वसाहतीत पाणी साचत आहे.कामोठे-खारघर दरम्यान जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून होता. मात्र खाडीप्रवण क्षेत्र असल्याने वन, पर्यावरण व इतर विभागाकडून परवानगी मिळत नव्हती. काही महिन्यांपूर्वी या कामाकरिता उच्च न्यायालयाने परवानगी दिली. त्याचबरोबर पर्यावरण व वन विभागाने हिरवा कंदील दाखवला. या कामाकरिता कोया अँड कंपनी ही एजन्सी नियुक्त करून त्वरित कामाला सुरुवात करण्यात आली. सिडकोने या अगोदर वाहिनी टाकण्याकरिता बांध घातला होता. त्या ठिकाणी पायलिंग करून कॉलम उभारण्यात आले आणि त्यावर आता पाइप सुध्दा टाकण्यात आले आहेत. कामोठे मानसरोवर हॉटेल ते खारघर सेक्टर २६ दरम्यान १५०० एमएम व्यासाची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. याकरिता माती टाकून बांध करण्यात आला आहे. काही ठिकाणी लोखंडी पूल उभारण्यात आले आहेत. मात्र यामुळे कळंबोली वसाहतीकडून येणाऱ्या पावसाच्या पाण्याला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता ही जमीन ठेवण्यात आली होती. परंतु या ठिकाणी पाइपलाइन टाकण्याकरिता मोठ्या प्रमाणात भराव झाला आहे. याच कारणाने कळंबोली वसाहतीतील पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग अडला गेला आहे. कळंबोली वसाहत विकसित करत असताना योग्य नियोजन न केल्याने वसाहत साडेतीन मीटर खाली राहिली याकरिता आपण न्यायालयीन लढाई लढत आहोतच. त्याचबरोबर पाण्याचा अडसर निर्माण होईल हे माहीत असतानाही सिडकोने कामोठे बाजूने वाहिन्या टाकल्या असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. कळंबोली बाजूने एमजेपीच्या जुन्या वाहिन्याच्या जागेवर नवीन वाहिनी टाकण्याचा प्रस्ताव त्यांनी सिडकोला दिला होता. परंतु तो मान्य न करता प्राधिकरणाने विरोधी बाजूला वाहिन्या टाकून कोट्यवधी रुपये खर्च पाण्यात घातला आहे. त्याचबरोबर कळंबोलीकरांसमोर पुराचे संकट उभे केला आहे. या संदर्भात आत्माराम पाटील यांनी सिडकोला पत्र दिले आहे. पावसाच्या पाण्याला जाण्याकरिता वाट करून देण्याची मागणी पत्रात केली आहे.पनवेल-सायन महामार्गामुळे पाणी अडलेपनवेल-सायन महामार्गाचेरुंदीकरण आणि पूल बांधण्याच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळी पाणी जाण्याचे मार्ग अडवून धरले. संबंधित ठेकेदाराने भराव करून काही ठिकाणी कळंबोली परिसरात हे नाले बुजवून टाकले आहेत. याबाबत सिडको निद्रिस्त अवस्थेत आहेच, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागानेही डोळेझाक केली आहे.कामोठे-खारघर जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर झाला आणि त्यावर नियंत्रणही दुसऱ्या विभागाकडे आहे. याबाबत पाहणी करून वरिष्ठांबरोबर चर्चा करून योग्य ती उपाययोजना करण्यात येईल.- किरण फणसे, अधीक्षक अभियंता