शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धामोळे आदिवासी पाड्याला टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: May 13, 2017 01:22 IST

खारघरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या धामोळे आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना गेल्या दोन वर्षांपासून पाण्यासाठी चांगलीच पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : खारघरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या धामोळे आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना गेल्या दोन वर्षांपासून पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागत होती. विशेष म्हणजे पाड्याला लागून असलेल्या गोल्फ कोर्सवरील गवतावर चोवीस तास पाण्याची फवारणी केली जात होती. मात्र आदिवासी पाड्यात मात्र पिण्याचे पाणीही मिळणे कठीण होते. या समस्येची दखल घेत आगरी कोळी युथ फाउंडेशनने स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरू केले. एकीकडे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकारणी व्यस्त असताना फाउंडेशनची ही मदत आदिवासी बांधवांना मोठी दिलासा देणारी ठरली आहे. पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही पुढाकार घेऊन दोन वर्षांपासून बंद असलेल्या जलवाहिनीतून पाणी सोडण्यास सुरु वात केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठवला आहे. याची दखल घेत आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी पाड्याची पाहणी केली. यावेळी गावातील दोन विहिरी कोरड्या पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे फाउंडेशनने स्वखर्चाने याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला. विशेष म्हणजे पनवेल महापालिकेच्या प्रभाग ३ मध्ये असलेल्या आदिवासी पाड्याकडे एकही राजकीय पदाधिकारी फिरकला देखील नाही. पनवेल महानगर पालिकेचे खारघर विभागीय अधिकारी श्रीराम हजारे यांनी देखील या घटनेची दखल घेत दोन वर्षांपासून बंद असलेल्या जलवाहिनीतून पाणी सोडण्यास सुरु वात केली. सिडकोसोबत समन्वय साधून दिवसातून दीड तास पाणी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.