शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केएलई महाविद्यालयात पाणीबचतीचे धडे

By admin | Updated: May 28, 2016 02:56 IST

पाणीटंचाईवर बचतीची उपाययोजना व्हावी याकरिता ‘लोकमत’ने जलमित्र अभियान हाती घेतले आहे. उपाहारगृह, सोसायट्यांबरोबर आता शाळा आणि महाविद्यालयात सुध्दा पाणीबचतीचा

कळंबोली : पाणीटंचाईवर बचतीची उपाययोजना व्हावी याकरिता ‘लोकमत’ने जलमित्र अभियान हाती घेतले आहे. उपाहारगृह, सोसायट्यांबरोबर आता शाळा आणि महाविद्यालयात सुध्दा पाणीबचतीचा संदेश देण्यात येत आहे. शुक्र वारी येथील के.एल.ई. महाविद्यालयात पाण्याचा अपव्यय टाळणे तसेच बचतीचे धडे देण्यात आले. ‘लोकमत’च्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाच त्याचबरोबर पाणीबचतीचा संकल्प करण्यात आला.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लोकमत जलमित्र हे अभियान अतिशय प्रभावीपणे राबवत आहे. शुक्रवारी कळंबोली येथील के.एल.ई. महाविद्यालयात जलमित्र अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली. पाणी हे जीवन असून पाऊस कमी पडल्याने टंचाई निर्माण झाली. ही नैसर्गिक आपत्ती असून त्याला केवळ सिडकोच किंवा इतर यंत्रणा जबाबदार नाही. टंचाईवर मात्र म्हणून बचत करणे ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. म्हणून आम्ही तत्कालीन पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या उपस्थितीत डिसेंबरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये पाणीबचतीचे प्रबोधन केले. त्याचबरोबर त्यांना याबाबत जागृती करण्याचे आवाहन केले. सामाजिक बांधिलकी या नात्याने के.एल.ई.ने बऱ्यापैकी जागृती केली असल्याचे प्राचार्य डॉ. ज्योती मारवा यांनी सांगितले. पाऊस कमी पडल्यामुळे या वर्षी पाण्याची प्रचंड कमतरता भासली ही वस्तुस्थिती सगळ्यांनाच मान्य करावी लागेल. पाणीटंचाई भासू नये याकरिता सिडकोने प्रयत्न केले त्याचबरोबर सोसायट्यांमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता जनजागृती सुध्दा केली असे किरण फणसे यांनी सांगितले. लहान मुले आणि घरकाम करणाऱ्या महिला पाण्याची नासधूस जास्त करतात यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रबोधन व्हावे असे फणसे यांनी मत व्यक्त केले. आपण साताऱ्यातील माण-खटाव तालुक्यातील मूळ रहिवासी आहे. येथे दुष्काळजन्य परिस्थिती असते. त्यामुळे पाण्याचे महत्त्व किती आहे याची जाण लहानपणापासूनच आहे. जमीन आमच्याकडे खूप आहे पण पाणी नसल्याने ती फुलवता किंवा पिकवता येत नसल्याची खंत सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण पवार यांनी व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयाचे संचालक एस.एन. शेट्टी, प्राचार्या डॉ. ज्योती मारवा, शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम, सिडकोचे अधीक्षक अभियंता किरण फणसे, कफचे अरूण भिसे, एमएनआरचे संचालक श्रवण, लक्ष्मी आय क्लिनिकचे वरिष्ठ व्यवस्थापक सचिन भूमकर, सुरेश महेश्वरी,सहाय्यक पो. नि. अरूण पवार, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आशिष खोब्रागडे, प्रा. ईल्ला अथिया उपस्थित होते.