शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा एमआयडीसीला पुनर्प्रक्रिया केलेले पाणी; सिडकोचे नियोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:57 IST

कळंबोली आणि कामोठे येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातून अदांजे ४५ द.ल.लीटर सांडपाण्यावर कळंबोली येथील नियोजित पुनर्प्रक्रिया प्रकल्पात गोळा केले जाणार आहे.

नवी मुंबई : पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी तळोजा क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्राला पुरविण्याचे नियोजन सिडको करीत आहे. त्यासाठी कळंबोली येथे मलनिस्सारण पुनर्प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पात पुनर्प्रक्रिया केलेले ३0 द.श.लीटर पाणी तळोजा एमआयडीसीतील उद्योगांना पुनर्वापरासाठी पुरविण्याचा सिडकोचा विचार आहे.

कळंबोली येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रात ५0 दशल लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. सध्या येथे २0 ते २५ द.ल. लीटर पाणी गोळा करून त्यावर प्रक्रिया केली जाते, तसेच कामोठे येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रात दररोज २0 ते २५ द.ल. लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. 

कळंबोली आणि कामोठे येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातून अदांजे ४५ द.ल.लीटर सांडपाण्यावर कळंबोली येथील नियोजित पुनर्प्रक्रिया प्रकल्पात गोळा केले जाणार आहे. या पाण्यावर या प्रकल्पात पुनर्प्रक्रिया करून साधारण ३0 द.ल.लीटर पाणी पुनर्वापरासाठी तळोजा एमआयडीसीला पुरविण्यात येणार आहे. सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्राच्या उभारणीसाठी सिडकोने तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली आहे. याद्वारे प्रकल्पाच्या उभारणीला येणारा खर्च व इतर आवश्यक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. २0२१ पर्यंत बांधून पूर्ण करण्याचा निर्धार आहे. 

कळंबोलीत सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्राचा प्रस्तावजगभरात पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या वापरावर भर दिला जात आहे. सिडकोनेही सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कळंबोली येथे मलनिस्सारण पुनर्प्रक्रिया केंद्र प्रस्तावित केले आहे. पाण्याची बचत आणि पर्यावरणाचे रक्षण यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण असल्याचे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :cidcoसिडको