शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

खाडीतील पाणी निकषाहून अधिक प्रदूषित

By admin | Updated: August 30, 2016 03:22 IST

मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील केमिकल कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडले जात आहे.

नामदेव मोरे,  नवी मुंबईमुंबई, ठाणे व नवी मुंबईतील केमिकल कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडले जात आहे. वर्षानुवर्षे प्रदूषण पसरविणाऱ्यांवर प्रशासनाकडून काहीही कारवाई होत नाही. यामुळे खाडीतील पाणी निकषापेक्षा तब्बल १५ पट जास्त दूषित झाले आहे. आॅक्सिजनचे प्रमाणही घटले असून पाण्यातील जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नवी मुंबईला निसर्गाचे वरदान लाभले आहे. परंतु विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला आहे. हवा व ध्वनी प्रदूषणाबरोबर पाणी प्रदूषणाची स्थितीही गंभीर झाली आहे. शहरात पिण्याचे पाणी शुद्ध असले तरी नाले, तलाव व खाडीतील पाणी प्रमाणापेक्षाही जास्त दूषित झाले असल्याचे महापालिकेच्या पर्यावरणविषयक अहवालावरून समोर आले आहे. ऐरोलीच्या दिवा ते बेलापूरच्या दिवाळेपर्यंत २२ किलोमीटरचा खाडी किनारा लाभला आहे. दिवाळे, वाशी, सारसोळे, करावे व इतर अनेक गावांमधील प्रकल्पग्रस्त नागरिकांचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून आहे. वाशीतील गुणाबाई सुतार या महिला विदेशात खेकडे निर्यात करण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु मागील काही वर्षांमध्ये प्रदूषणामुळे खाडीतील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसीतील केमिकल कंपनीमधील पाणी प्रक्रिया करून खाडीत सोडणे आवश्यक आहे. परंतु अनेक कंपन्या रसायनमिश्रित पाणी खाडीत सोडत आहेत. याशिवाय मुंबई व ठाणेमधील मलनि:सारणसह सर्व दूषित पाणी खाडीत सोडले जात आहे. खाडीमधील पाण्यात क्लोराईडची मात्रा ६०० एमजीएल एवढी असणे आवश्यक आहे. परंतु शहरात ऐरोलीमध्ये सर्वात कमी ६०६० व वाशीमध्ये सर्वात जास्त १५१८८ एमजीएल एवढे आहे. क्लोराईडचे प्रमाण सरासरी १५ टक्के एवढे जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. खाडीच्या पाण्यामधील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. पाण्यातील डीओ चे प्रमाण ४ ते ७ एवढे आवश्यक आहे. परंतु ऐरोलीमध्ये ते १.७ व सानपाडाजवळ ३.५ एवढी कमी आढळले आहे. वाशीमध्ये पाण्यातील बीओडीचे प्रमाण निकषांपेक्षा दुप्पट असल्याचे समोर आले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये १० मुख्य नाले व इतर २० छोटे नाले आहेत. एकूण ७४,२८२ मीटर लांबीचे असून ते डोंगरावरील पावसाचे पाणी खाडीपर्यंत वाहून नेतात. परंतु याच पाण्यातून उद्योजक रसायनमिश्रित पाणी खाडीमध्ये सोडून देत आहेत. तुर्भेमधील नाल्यात सस्पेंडेड सॉलिड्सचे प्रमाण दुप्पट आहे. तुर्भे वाशी सेक्टर १८ व नेरूळ पामबीच रोडजवळील नाल्यात क्लोराईडचे प्रमाण जास्त आढळले आहे. या सर्वांचा परिणाम खाडीतील जीवसृष्टीवर होत आहे. खाडीत मासे सापडत नसल्याने कोळी बांधवांना समुद्रात दूरवर जावे लागत असून अशीच स्थिती राहिली तर मासेमारीचा व्यवसाय बंद करावा लागेल, अशी भीती वाटू लागली आहे.