शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जलसंवर्धनामुळे पूरनियंत्रण शक्य

By admin | Updated: June 25, 2017 04:12 IST

महाडमधील सावित्री नदीच्या पूरनियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शक्य आहे. तसेच उन्हाळ््यातही पाणीटंचाईवर मात करून बारमाही कृषी

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : महाडमधील सावित्री नदीच्या पूरनियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शक्य आहे. तसेच उन्हाळ््यातही पाणीटंचाईवर मात करून बारमाही कृषी उत्पादनासाठी मोठे जलसंवर्धन येथे शक्य असल्याचा निष्कर्ष प्राचार्य डॉ. समीर बुटाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.दरवर्षी पावसाळा जवळ आला की, महाडमधील २५ हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या मनात सावित्रीच्या पुराची भीती निर्माण होते. पूरसमस्यांबाबत गेल्या दहा वर्षांच्या नोंदींचे संकलन करून बुटाला यांनी वरील महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर ठेवले आहेत. महाड शहराला सावित्री, गांधारी व काळ अशा तीन नद्यांनी वेढलेले आहे. सावित्री नदी महाबळेश्वर येथे उगम पावते. तर काळ आणि गांधारी या दोन्ही नद्या रायगड जिल्ह्यात उगम पावतात. काळ नदी बिरवाडी येथे सावित्री नदीला येऊन मिळते आणि त्या ठिकाणाहून सावित्रीचे पात्र मोठे होऊ लागते. तर महाड शहराची हद्द संपल्यानंतर गांधारी नदी सावित्री नदीस येऊन मिळते. महाडची नोंद इ.स.पूर्व २२५मध्ये कोकण किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर व व्यापारी केंद्र म्हणून नोंद आहे. सावित्री, गांधारी, काळ या तीन नद्या महाड परिसरात असून, बाणकोट ही जवळची खाडी आहे. याच खाडीतून बोटीद्वारे व्यापारी वाहतूक सतत चालत असे. इ.स.१६५६मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला ताब्यात घेतला आणि राजधानीचे बंदर म्हणून महाड महत्त्व प्राप्त झाले. गेल्या ४० ते ५० वर्षांत सावित्री नदीपात्र गाळाने पूर्णपणे भरून गेले आणि त्यामुळे महाडमधील पूरसमस्येची निर्मिती झाल्याचे बुटाला यांनी सांगितले.महाडमधील पूरसमस्येला आळा घालण्याकरिता सावित्री नदीतील गाळ काढणे, नदीला स्वरक्षण भिंत बांधणे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे गांधारी व काळ या दोन्ही नद्यांना मिळणाऱ्या प्रवाहात बंधारे घालून पाणी अडवून साठवणे हे अत्यावश्यक आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे महाड शहरात २ ते ५ फुटांपर्यंत पाण्याची पातळी महाड शहराच्या रस्त्यांवर पावसाळ््यात पाहावयास मिळते. याच अतिरिक्त पाण्याचे नियोजन करणे शक्य आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर हे धरण महाड शहरापासून अवकाशीय अंतराने ३३ कि.मी. आहे. तर मुळशी धरणाचे अवकाशीय अंतर २३ कि.मी. आहे. जलसंधारणाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार हे अतिरिक्त पाणी या दोन्ही धरणांत सोडणे अशक्य नाही. दुसरा पर्याय म्हणजे सावित्री नदीत टप्प्याटप्प्यांनी बंधारे बांधून पाणी अडवून ते धरणात सोडणे शक्य आहे.