शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

खारजमीन संशोधन केंद्रात सांडपाणी, पनवेल महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 02:40 IST

पनवेल शहराचे वैभव असलेल्या खारजमीन संशोधन केंद्रामध्ये एक महिन्यापासून महापालिकेच्या मलनि:सारण वाहिनीमधील पाणी शिरू लागले आहे

नामदेव मोरेनवी मुंबई : पनवेल शहराचे वैभव असलेल्या खारजमीन संशोधन केंद्रामध्ये एक महिन्यापासून महापालिकेच्या मलनि:सारण वाहिनीमधील पाणी शिरू लागले आहे. यामुळे भात संशोधनाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. पिकामध्ये दूषित पाणी जावून भात शेतीचे प्रचंड नुकसान होवू लागले असून त्याचा परिणाम बियाणांच्या निर्मितीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महापालिकेची निर्मिती होवून एक वर्ष झाले असले तरी प्रत्यक्षात पनवेल शहराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. पनवेल शहराचे वैभव वाढविणा-या प्रकल्पांमध्ये खार संशोधन केंद्राचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीच्या अंतर्गत असलेले हे केंद्र १९४३ मध्ये सुरू झाले आहे. तब्बल ७४ वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या या केंद्राने भात संशोधनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. खारजमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे भात पीक घेतले जाईल याविषयी अभ्यास केला जात आहे. केंद्राने पनवेल १, २ व ३ या नावाने भाताचे प्रकार विकसित केले आहेत. १२ हेक्टर जमिनीवर संशोधन व बियाणांची निर्मिती केली जात आहे. या बियाणांना शेतकºयांकडून प्रचंड मागणी आहे. पनवेल महापालिकेने त्यांची मलनि:सारण वाहिनी संशोधन केंद्र परिसरातून नेली आहे. आॅक्टोबरमध्ये अनेक ठिकाणी मलनि:सारण वाहिन्यांचे चेंबर फुटले आहेत. चेंबरमधील पाणी शेतामध्ये साचू लागले आहे. यामुळे जवळपास एक महिन्यापासून शेतामध्ये काम करणे अशक्य होवू लागले आहे. याठिकाणी बियाणांची निर्मिती केली जाते. बियाणे दर्जेदार असावे यासाठी भाताची लागवड करण्यापासून ते पिकाची कापणी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट वेळेत व व्यवस्थित होणे आवश्यक असते. परंतु मलनि:सारण वाहिनी फुटल्यामुळे संशोधन केंद्रातील वेळापत्रक कोलमडले आहे.साईनगर परिसरामध्ये असलेल्या केंद्राच्या पुढील बाजूला महापालिकेचे मलनि:सारण केंद्र आहे. मलनि:सारण वाहिनीमधील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. यामुळे अनेक ठिकाणी चेंबर फुटू लागले आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार घडत आहेत. भात संशोधन केंद्राच्या जमिनीच्या उंचवट्याकडील भागातून मलनि:सारण वाहिनी गेली आहे. यामुळे फुटलेल्या चेंबरमधील पाणी पूर्ण शेतामध्ये घुसले आहे. संशोधन केंद्रातील कृषीशास्त्रज्ञांनी व कर्मचाºयांनी प्रचंड परिश्रम करून विकसित केलेले भाताच्या बियाणांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालिका प्रशासनाने विलंब न करता दुरूस्तीचे काम सुरू करावे व पुन्हा अशाप्रकारे मलनि:सारण वाहिनी फुटणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.या प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील कृषी शास्त्रज्ञांनी मनपा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची भेट घेतली असून योग्य दखल घ्यावी व बियाणे निर्मितीच्या प्रक्रियेमधील अडथळा दूर करावा, अशी मागणी केली आहे.