शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कामगार लावताहेत कचऱ्याला आग!

By admin | Updated: March 29, 2016 03:06 IST

वाशी ते पनवेल दरम्यानच्या रेल्वे स्थानकांची साफसफाई केल्यानंतर कचरा त्याच परिसरात जाळला जात आहे. यामुळे रेल्वे पटरीजवळील गवत व वृक्षांनाही आग लागत आहे.

नवी मुंबई : वाशी ते पनवेल दरम्यानच्या रेल्वे स्थानकांची साफसफाई केल्यानंतर कचरा त्याच परिसरात जाळला जात आहे. यामुळे रेल्वे पटरीजवळील गवत व वृक्षांनाही आग लागत आहे. रोजच हा प्रकार होत प्रदूषणही वाढत आहे. नवी मुंबईमध्ये सिडकोने अत्याधुनिक रेल्वे स्टेशन उभारली आहेत. स्टेशन व परिसरातील साफसफाई करण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. ठेकेदार साफसफाई करतात व सर्व कचरा स्टेशनच्या बाहेरील मोकळ्या जागेवर टाकून जाळला जातो. कचऱ्याला आग लावताना ती पटरीजवळील गवत व झुडपांनाही लागत आहे. सोमवारी वाशी ते सानपाडा दरम्यान अशीच आग लागली. दोन दिवसांपूर्वी सानपाडा स्टेशन ते दत्तमंदिर दरम्यानही गवताला आग लागली होती. महापालिका, रेल्वे व सिडको प्रशासनाने ठेकेदाराला समज द्यावी. कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे. रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात येणाऱ्या आगीकडे ठेकेदारही दुर्लक्ष करत आहेत. जवळपास दहा वर्षांपासून कचरा जाळण्याचा प्रकार सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या समोरच हा प्रकार सुरू असतानाही कोणीच आक्षेप घेत नाहीत. कचऱ्याला आग लावण्याच्या घटना थांबल्या नाहीत तर पोलीस ठाण्यात व महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे तक्रार करण्याचा इशारा पर्यावरणप्रेमी कृष्णा शेलार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)