शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसी फळ मार्केटसमोर कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 02:31 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटसमोर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटसमोर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एपीएमसी परिसरामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने व्यापाºयांसह कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यापासून अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एपीएमसी वाहतूक पोलीस चौकीपासून माथाडीभवनकडे जाणाºया रोडवरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. फळ मार्केटच्या समोरच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कचºयामुळे प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे.द फ्रूट अँड मर्चंट असोसिएशनने याविषयी तुर्भे विभाग कार्यालयाकडे २० पेक्षा जास्त वेळा पत्रव्यवहार केला आहे. येथील फेरीवाले हटविण्यात यावेत. सर्व्हिस रोड अतिक्रमणमुक्त केला जावा अशी मागणी केली आहे. परंतु तुर्भे विभाग कार्यालयाला हा परिसर फेरीवालामुक्त करण्यात यश आलेले नाही. विभाग कार्यालयातील कर्मचाºयांच्या निष्काळजीपणामुळेच या परिसरातील अतिक्रमण वाढत असल्याचा आरोप होवू लागला आहे.कचºयामुळे बाजार समिती परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रोगराई पसरल्यानंतर महापालिका कारवाई करणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही केली जात आहे.>फळ मार्केटच्या समोर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मोठ्याप्रमाणात कचरा याठिकाणी टाकला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही महापालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे.- संजय पानसरे, व्यापारी प्रतिनिधी>मुुंढे बरे होतेमहापालिका आयुक्तपदावर तुकाराम मुुंढे असताना फळ मार्केटसमोरील अनधिकृत फेरीवाल्यांवर ठोस कारवाई केली होती. ते नवी मुंबईमध्ये असेपर्यंत पोलीस चौकी ते माथाडीभवन परिसर अतिक्रमणमुक्त झाला होता. त्यांच्या बदलीनंतर फेरीवाल्यांवर वचक राहिला नसून मुंढे बरे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.