शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाचा इशारा : अवैध पार्किंगच्या कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 01:45 IST

आंदोलनाचा इशारा : रस्त्यांवर उभ्या अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका

नवी मुंबई : तुर्भेतील इंदिरानगर परिसरात रस्त्यांवर होणाऱ्या अवैध पार्किंगमुळे अपघातांचा धोका उद्भवत असतानाही वाहतूक पोलिसांसह पालिकेचे कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त होत असून, उपोषण करून आंदोलन छेडण्याचा इशारा स्वावलंबी सामाजिक सेवा भावी संस्थेने दिला आहे.

एमआयडीसी क्षेत्रांतर्गतचे रस्ते अवैध पार्किंगने व्यापले आहेत. रासायनिक साठा असलेले टँकर तसेच इतर अवजड वाहने रस्त्यांवरच दिवस-रात्र उभी केली जात आहेत. यामुळे रहदारीला अडथळा होत असून, पादचाऱ्यांचे अपघातही घडत आहेत. त्यामुळे तुर्भे नाका ते इंदिरानगर दरम्यान रस्त्यांवर होणाºया अवैध पार्किंगवर कारवाईची मागणी सातत्याने होत आहे. त्यासंदर्भात स्वावलंबी सामाजिक सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी पालिका व वाहतूक पोलिसांकडे मागणीही केली आहे; परंतु रस्त्यांलगत चालणारे गॅरेज व ज्या कंपन्यांचे टँकर रस्त्यावर उभे केले जात आहेत, त्यांच्या पाठीशी राजकीय वरदहस्त असल्याने कारवाईकडे चालढकल होतआहे. यामुळे येत्या काही दिवसांत तिथल्या अवैध पार्किंगवर कारवाई न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी वाहतूक पोलिसांसह पालिकेला दिला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई