शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलकरांना प्रतीक्षा पासपोर्ट कार्यालयाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 02:12 IST

पनवेलमधील नियोजित पासपोर्ट कार्यालय संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी असणार आहे.

- वैभव गायकरपनवेल : पनवेलसह रायगड जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थेट ठाणे गाठावे लागते. पनवेल शहराची व्याप्ती पाहता मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडे स्वतंत्र पासपोर्ट कार्यालयाची मागणी केली होती. २०१७ मध्ये ही मागणी तत्कालीन केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंजूरही केली होती. मात्र, सध्याच्या घडीला जागेअभावी पनवेल पासपोर्ट कार्यालय लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.पनवेलमधील नियोजित पासपोर्ट कार्यालय संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी असणार आहे. वर्दळीसाठी सोयीचे असल्याने शहारात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. मात्र, दोन वर्षे झाली तरी अद्याप पनवेल पासपोर्ट कार्यालय सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. नवीन पनवेल येथील टपाल आॅफिसमध्ये हे पासपोर्ट कार्यालय सुरू होणार होते. जागा निश्चित करण्यात आली होती. तसे पत्र पासपोर्टचे मुंबई क्षेत्रीय कार्यालयानेही पनवेलच्या पोस्ट कार्यालयाला पाठविले होते.सध्याच्या परिस्थितीनुसार टपाल कार्यालयाने जागेचे कारण दाखवत पासपोर्ट कार्यालयाला जागा देण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे पनवेलमध्ये पासपोर्ट कार्यालय नेमके होणार तरी कुठे? असा प्रश्न पनवेलसह रायगड जिल्ह्यातील रहिवाशांना पडला आहे. जागेअभावी कार्यालय सुरू होण्यास उशीर लागत असल्याने सिडको किंवा महापालिकेशी समन्वय साधून हा विषय सोडविण्याची गरज आहे. रायगड जिल्ह्यातून सध्याच्या घडीला पनवेल शहरातून सर्वात जास्त आवेदन पासपोर्ट कार्यालयाला प्राप्त होत आहेत. संबंधित विषयासंदर्भात क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी मुंबई स्वाती कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई