शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना प्रतीक्षा भरपाईची, शासनाकडून निधी येण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:13 IST

कर्जतमधील ८८३२ शेतकरी : शासनाकडून निधी येण्यास विलंब होत असल्याने नाराजी

कांता हाबळे

नेरळ : शासनाने २७ नोव्हेंबर २०१९ रोजी अवकाळी पावसाळ्यामुळे भातपिकाच्या नुकसानीबद्दल मदतीचा पहिला टप्पा म्हणून १६१२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली होती. मात्र त्यानंतर शेतीचे पंचनामे झालेल्या ८४३२ शेतकºयांना अद्याप शासनाची मदत मिळालेली नाही. २७ नोव्हेंबर रोजी राज्यात सरकार स्थापन नव्हते आणि त्या वेळी शेतकºयांना मदत झाली, पण सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

कर्जत तालुक्यातील २९४२ हेक्टर जमिनीवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यात तालुक्यातील १०,०४६ शेतकºयांच्या शेतातील भाताचे, नागली, वरी या पिकाचे नुकसान झाले होते. कर्जत तालुक्यातील सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात झालेल्या भातशेतीचे नुकसान सरत्या पावसाने केले. त्या नुकसानीबद्दल शासनाने हेक्टरी ८००० ची मदत जाहीर केली होती. त्यावेळी पंचनाम्यानुसार कर्जत तालुक्यात १०,०४६ शेतकºयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना महसूल विभागाकडून पहिल्या टप्प्यात २७ नोव्हेंबर २०१९ रोजी मदत देण्यात आली होती. त्यावेळी १,६१२ शेतकºयांना त्यांच्या शेतीच्या नुकसानीची मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा केली गेली होती. त्यावेळी शासनाकडून ५८,१०, ३१३ एवढी रक्कम बँक खात्यात जमा केली होती. आता उर्वरित नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जत तालुक्यातील मदत पोहचली नसलेल्या उर्वरित ८४३२ नुकसानग्रस्त शेतकºयांना मदतीसाठी आवश्यक असलेली २ कोटी रकमेची मागणी कर्जत तहसील कार्यालयाने रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.शेतकºयांना शासनाने हेक्टरी ८००० रुपयांचे अनुदान मदतीनिधी देण्याचे निश्चित केले आहे. ज्यावेळी शासनाने नुकसान भरपाईची मदत जाहीर केली, त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ती मदत जाहीर केली होती. पण ती मदत अपुरी असल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त केली होती. परंतु नवीन सरकार सत्तेवर आल्यावर त्यात वाढ होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. पण कर्जत तालुक्यातील ८० टक्के शेतकरी यांना हेक्टरी ८००० प्रमाणे जाहीर झालेली भरपाई मदत अद्याप पोहोचली नाही.बळीराजा संकटातच्२७ नोव्हेंबरनंतर उर्वरित शेतकºयांच्या बँक खात्यात लगेच नुकसानभरपाईची मदत दिली जाईल, असे कर्जत तहसील कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र २५ दिवसांचा कालावधी लोटला तरी शासनाची मदत काही नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. यामुळे बळीराजा संकटात आला आहे.पंचनामे झालेल्या सर्व शेतकºयांच्या आधार कार्ड, बँक डिटेल्स आणि सातबारा उतारा यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली आहे. आमच्या कार्यालयाकडून मदतीबद्दल कोणतीही कसर शिल्लक नाही. मात्र मदत प्राप्त झाल्यानंतर काही तासांत ती मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होऊ शकते असे नियोजन केले आहे.- विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत 

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबईFarmerशेतकरी