शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयाची प्रतीक्षा कायम

By admin | Updated: January 10, 2017 07:04 IST

सिडकोने एसटी महामंडळाला दिलेल्या दोन भूखंडावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोटारवाहन

नामदेव मोरे / नवी मुंबईसिडकोने एसटी महामंडळाला दिलेल्या दोन भूखंडावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोटारवाहन अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याची घोषणा एक वर्षापूर्वी केली होती. वर्षभरामध्ये दोन्ही भूखंडावर नामफलक लावले आहेत; पण प्रत्यक्षात कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. यामुळे बाळासाहेबांचे नाव असलेले हे महाविद्यालय प्रत्यक्षात कधी सुरू होणार? असा प्रश्न शिवसैनिकांना पडू लागला आहे. नवी मुंबईच्या उभारणीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत शिवसेना सत्तेत आली होती. पालिकेचे वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालय, विष्णुदास भावे नाट्यगृह व नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनाखाली सुरू झाली; परंतु नवी मुंबईमधील सत्ताधारी व विरोधकांना बाळासाहेबांच्या योगदानाचा विसर पडला आहे. शहरात बाळासाहेबांचे स्मारक नाहीच; पण एकही महत्त्वाच्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आलेले नसल्याची खंत जुने शिवसैनिक व्यक्त करू लागले आहेत. विद्यमान परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी २२ जानेवारी, २०१६ रोजी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त पाच महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. या घोषणांमध्ये नवी मुंबईमधील एपीएमसीच्या फळमार्केटच्या बाजूला व आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या दोन विस्तीर्ण भूखंडावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मोटारवाहन अभियांत्रिकी महाविद्यालय व वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली होती. यामुळे शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले होते. एसटी महामंडळाची २५० दुरुस्ती डेपो व ३ मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. या कार्यशाळांसाठी मोटारवाहन अभियंत्यांची गरज असते. यामुळे नवी मुंबईमध्ये २४० विद्यार्थी क्षमतेचे स्वतंत्र महाविद्यालय व वसतिगृह सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परिवहनमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला एक वर्ष पूर्ण होत आले आहे. या वर्षभरामध्ये महाविद्यालय उभारण्यासाठी सुरुवात झालेली नाही. यासाठीच्या आवश्यक परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत. प्रत्यक्षात कामाचे भूमिपूजनही झालेले नाही. एक वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त दोन्ही भूखंडावर नामफलक लावण्यात यश आले आहे. ही जागा परिवहन महामंडळाच्या मुंबई विभागाच्या मालकीची असून, ती बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयासाठी राखीव आहे. तेथे अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. लवकर प्रत्यक्ष महाविद्यालय उभारण्याचे काम सुरू झाले नाही, तर हा फलक धूळखात पडेल व या भूखंडावर अतिक्रमण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या २३ जानेवारीपर्यंत येथे महाविद्यालयाच्या कामाची सुरुवात होणार का? याकडे आता शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. भूखंडाची धर्मशाळा च्फळमार्केच्या मागील बाजूला असलेल्या भूखंडावर पूर्वी एसटी डेपो सुरू केला होता; पण तो बंद पडला आहे. येथे प्रसाधनगृहाचा वापर पूर्वी गांजाचा साठा करण्यासाठी केला जात होता. आता येथील पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी व वाहन पार्किंगसाठी केला जात आहे. या जागेला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले असून, त्याचा वापर कोणीही करू लागले आहे. पार्किंग सुरू करण्याचा डाव च्एसटी महामंडळाच्या दोन्ही भूखंडावर पे अ‍ॅण्ड पार्क योजना सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या मध्यस्थीने त्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अद्याप परवानगी मिळालेली नाही; पण अनधिकृत पे अ‍ॅण्ड पार्किंग सुरू करण्याचाही विचार सुरू आहे. झोपड्या उभारण्याची, अतिक्रमणाची भीतीच्आरटीओ कार्यालयाजवळील एसटी महामंडळाच्या भूखंडाच्या संरक्षण भिंतीबाहेर अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. भूखंडाच्या दुसऱ्या टोकावरही अतिक्रमण झाले आहे. लवकर भूखंडाचा वापर सुरू झाला नाही, तर तेथेही अतिक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.