शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आगाराच्या कामाला मुहूर्ताची प्रतीक्षा

By admin | Updated: June 23, 2017 06:04 IST

गुजरात परिवहन महामंडळाच्या सुरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बांधणार, अशी घोषणा करून दोन वर्षे उलटली.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : गुजरात परिवहन महामंडळाच्या सुरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बांधणार, अशी घोषणा करून दोन वर्षे उलटली. मात्र, अद्याप या कामास सुरुवात झालेली नाही. शिवाय, २०१८पर्यंतही हे काम सुरू होऊ शकणार नाही, अशी कबुली महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पनवेलकरांना अद्ययावत सोयी-सुविधांयुक्त आगाराचे स्वप्न पूर्ण होण्यास अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. आगार अद्ययावत कराल तेव्हा करा. मात्र, पावसाळ्यात आगारातील खड्डे तरी भरा, अशी प्रवाशांची मागणी आहे.मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पनवेलमधून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात एसटीच्या गाड्या जातात. नैना प्रकल्पामुळे पनवेलचे महत्त्व वाढले आहे. येथील नागरीकरणाच्या वाढण्याचा वेग पाहून एसटी आगाराचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुजरात परिवहन मंडळाच्या सुरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बीओटी तत्त्वावर (बांधा, वापरा, हस्तांतरित करा), बांधण्याचा निर्णय घेऊन नवीन २८० कोटींचा प्रस्ताव तयार केला. त्याची निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख २७ जून २०१७ आहे. त्यानंतर त्या प्रस्तावाची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. प्रस्ताव योग्य वाटल्यास वित्त शाखेकडून तपासणी केली जाईल. त्यानंतर संचालक मंडळाची मंजुरी व शेवटी सरकारची मंजुरी. या प्रक्रि येतून गेल्यावर पनवेल महापालिकेची मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरु वात होईल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या व्यापारी संकुलाचे विभागीय अभियंता माधव ताटके यांनी दिली आहे. पनवेल आगाराच्या आवारात अनेक मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचून सर्वत्र चिखल तयार होतो. त्यातून मार्गक्रमण करताना प्रवाशांना कसरत करावी लागते. शिवाय, बसचे टायर पंक्चर किंवा फुटण्याचा धोका उद्भवू शकतो. आगार प्रमुखांच्या कार्यालयात जातानाही साचलेल्या पाण्यातून, चिखलातून जावे लागते. आगाराचे नूतनीकरण होणार म्हणून येथील खड्डे बुजवण्याच्या कामाकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.