शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीच्या ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:23 IST

गैरहजर असलेल्या कामगारांचीही हजेरी लावून त्यांचा पगार काढला जात असल्याची बाब एनएमएमटीमध्ये उघडकीस आली होती.

नवी मुंबई : गैरहजर असलेल्या कामगारांचीही हजेरी लावून त्यांचा पगार काढला जात असल्याची बाब एनएमएमटीमध्ये उघडकीस आली होती. या प्रकरणी एका कर्मचाºयाला निलंबित करण्यात आले असून, अद्याप कोणत्याच अधिकाºयावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या बोगस हजेरी प्रकरणात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाईची मागणी होत आहे.नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात कर्मचाऱ्यांची बोगस हजेरी लावून पगार काढला जात असल्याची बाब आॅक्टोबर २०१९ मध्ये उघड झाली होती. या प्रकरणी हजेरी नोंद करणाºया अनंत तांडेल या कर्मचाºयाला तत्काळ निलंबित करण्यात आले होते. तर हजेरी तपासणी करणाºया इतर एका कर्मचाºयालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणावरून एनएमएमटीमध्ये गैरहजर कामगारांच्या हजेरी लावून प्रशासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला जात असल्याचे समोर आले होते. तांडेल हा गेली अनेक वर्षांपासून कामगारांच्या हजेरीच्या नोंदी ठेवण्याचे काम करत होता. मात्र, नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यातील हजेरी तपासल्या असता, त्यामध्ये १५ कर्मचारी गैरहजर असतानाही त्यांची हजेरी लावण्यात आल्याचे आढळून आले. यामुळे या संपूर्ण प्रकरणात इतरही अधिकाºयांचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्याचा उलगडा करण्यासाठी प्रशासनाने समितीही गठित केली होती; परंतु दोन महिने उलटूनही एकाही अधिकाºयावर कारवाई करण्यात आलेली नाही. अधिकाºयांच्या संगनमतानेच हा घोटाळा आजवर चालत आल्याची शंका वर्तवली जात आहे, त्यामुळेच हजेरी लावण्यापासून ते पगार काढण्यापर्यंत सर्वांच्याच नजरेतून बोगस हजेºयांकडे दुर्लक्ष होत होते. यामुळे मागील दोन वर्षातले कर्मचाºयांचे हजेरी पट व इतर दस्तावेज तपासले जात आहेत. त्यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा उघड होण्याचीही शक्यता आहे; परंतु कर्मचाºयावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्यात प्रशासन हात आखडता घेत असल्याचाही संशय वर्तवला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून एनएमएमटी तोट्यात चालवली जात आहे. अशातच कर्मचाºयांच्या बोगस हजेरी लावून तिजोरीवर हात मारला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाईचीही मागणी होत आहे.