शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

१५ हजार महिला बचतगटांना व्यावसायिक प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 02:15 IST

महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंसिध्द करण्यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये १५ हजार महिला बचतगट स्थापन करण्यात आले आहेत

जयंत धुळपअलिबाग : महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंसिध्द करण्यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये १५ हजार महिला बचतगट स्थापन करण्यात आले आहेत. या बचतगटांतील महिलांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी दिली आहे. रविवारी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन बँकेच्या संचालिका प्रीता चौलकर यांच्या हस्ते तर नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुधाकर रघतवान यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, त्यावेळी नाईक बोलत होते.प्रशिक्षणाच्या माध्यमातून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महिला आर्थिक विकासाकरिता कटिबद्ध असून बँकेच्या माध्यमातून या सर्व महिलांचा आर्थिक विकास होण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महिला बचतगटांसाठी सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. नाबार्डच्या सहकार्यातून विशेष प्रशिक्षण कार्यक्र म संपूर्ण जिल्ह्यात आयोजित केले जातात. त्याचीच सुरु वात अलिबाग तालुक्यातील प्रशिक्षण कार्यक्र माने बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये करण्यात आली.या प्रशिक्षणानंतर या महिलांना व्यवसाय करण्यासाठी अत्यल्प व्याजाने कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे नाईक यांनी पुढे सांगितले.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्थापन केलेले १५ हजारपेक्षा अधिक बचतगट प्रत्यक्ष कार्यरत असून ६ हजारपेक्षा अधिक बचतगटांना रायगड जिल्हा फेडरेशनच्या माध्यमातून संघटित करण्यात आले आहे. रायगड जिल्हा फेडरेशनच्या मदतीने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बचतगटांसाठी विविध विषयांचे प्रशिक्षण आयोजित करीत असते. भविष्यामध्ये महिलांना स्वत:चे उद्योग सुरु करण्यात मदत व्हावी याकरिता बँकेने एक महिना कालावधीचे शिवणक्लास तसेच संगणक विषयांचे विशेष प्रशिक्षण निश्चित केले आहे. या कार्यक्र मात मुख्य विषयांच्या समवेत मार्केटिंग, आर्थिक नियोजन, बँकिंग व्यवहार विषयांवर सुद्धा प्रशिक्षण दिले जाणार आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची ही संकल्पना असून यांनीच स्वत: असे प्रशिक्षण कार्यक्र म जास्तीत जास्त बचतगटातील महिलांसाठी आयोजित करण्यास सांगितल्याची माहिती नाईक यांनी पुढे दिली.