शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

खड्ड्याने घेतला प्रवाशाचा बळी; सायन-पनवेल महामार्गावरील उरण फाट्याजवळ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 03:18 IST

सायन-पनवेल महामार्गाचे काम निकृष्ट झाले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उरण-फाटा येथे खड्ड्यामुळे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

नवी मुंबई, पनवेल : सायन-पनवेल महामार्गाचे काम निकृष्ट झाले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उरण-फाटा येथे खड्ड्यामुळे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातून मुंबईमध्ये येण्यासाठी सायन-पनवेल महामार्ग हाच महत्त्वाचा रोड आहे. या रोडवरून रोज जवळपास तीन लाख वाहनांची ये-जा सुरू असते. महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने महामार्गाचे रुंदीकरण केले; परंतु त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी वाढले आहेत. गतवर्षी उरण फाटा येथे अपघातांची मालिका सुरू झाली होती. सीबीडीमधील एका प्रवाशाचा मृत्यूही झाला होता. यावर्षी पुन्हा उरण फाटा परिसरामध्ये खड्ड्यांमुळे अपघात होऊ लागले आहेत. तळोजा येथे राहणारे इब्राहिम मोहम्मद खुर्शीद (५८) यांच्या दुचाकीला अपघात झाला. अचानक समोर आलेल्या खड्ड्यामध्ये चाक गेल्याने त्यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर कोसळले. मागून आलेली वाहने त्यांच्या शरीरावरून गेल्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.खड्ड्यांमुळे खुर्शीद यांचे निधन झाले असून, या प्रकरणी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उरण फाटा येथे खड्ड्यांमुळे गुरुवारी प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली होती. दिवसभर चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. तुर्भे उड्डाणपुलावरही चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती.खारघर ते कळंबोली दरम्यानही अवस्था बिकट आहे. कळंबोली पुरुषार्थ पेट्रोलपंपाजवळ उड्डाणपुलाखाली महामार्गाची चाळण झाली आहे.खड्ड्यांविषयी मंत्र्यांनाही पत्रमहामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. रोज वाहतूककोंडी होऊ लागली आहे. तुर्भे उड्डाणपूल, नेरुळ, उरणफाटा, कळंबोली परिसरामध्ये वारंवार चक्काजाम होत आहे, यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊ लागला आहे. या विषयी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांच्याकडेही नागरिकांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.दुरवस्थेचे विधानसभेत पडसादसायन-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेचे गुरुवारी विधानसभेत पडसाद उमटले. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी हा प्रश्न उपस्थित करून महामार्गाच्या निकृष्ट कामाला जबाबदार असलेल्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल कारावेत. तसेच या महामार्गाचे नव्याने काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर संबंधित कंत्राटदारांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. तसेच महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.येशी ते खुर्शीद अपघाताची मालिकासायन-पनवेल महामार्गावर गतवर्षी पावसाळ्यामध्ये उरण फाटा येथे अपघात होऊन नेरुळ येथील चंद्रकांत येशी यांचा मृत्यू झाला होता. सीबीडीमध्ये राहणारे येशी कामानिमित्त नेरुळमध्ये जात असताना हा अपघात झाला. याच ठिकाणी यावर्षी खड्ड्यांमुळे अपघात होऊन इब्राहिम मोहम्मद खुर्शीद यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.महामार्गावर ज्या-ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, ते बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, काही दिवस पाऊस पडत असल्याने अडचणी येत आहेत. पाऊस उघडल्यानंतर सर्व कामे पूर्ण करण्यात येतील.- एस. व्ही. अलगुर,उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई