शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विचुंबे पूल वाहतुकीसाठी धोकादायक, दोन्ही बाजूचा रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 03:29 IST

दोन्ही बाजूने रस्ता खचल्यामुळे नवीन पनवेल-विचुंबे जोडपूल धोकादायक झाला आहे. यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : दोन्ही बाजूने रस्ता खचल्यामुळे नवीन पनवेल-विचुंबे जोडपूल धोकादायक झाला आहे. यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून विचुंबे ग्रामपंचायतीकडून खचलेला भाग वारंवार बुजवण्यात येत आहे. संबंधित यंत्रणेकडून या संदर्भात दुर्लक्ष होत आसल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे. दरम्यान, संभाव्य अपघात टाळण्यासाठी या पुलाबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी विचुंबे येथील रहिवाशांनी केली आहे.नवीन पनवेलच्या बाजूला असलेल्या विचुंबे, उसर्ली, देवत, शिवकर, मोह या गावांमध्ये मोठमोठ्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. या परिसरात एक ते दीड लाख लोकवस्ती झालेली आहे. या ठिकाणी राहणारे चाकरमानी, व्यावसायिक लोकल पकडण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकावर येतात. त्यामुळे नवीन पनवेल-विचुंबे या जोडपुलावरील रहदारी आणखी वाढलेली आहे. तसेच गाव आणि परिसरात नवीन इमारतींची मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे दिवसभर अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. या सर्वांचा भार या पुलावर पडताना दिसत आहे. हा पूल २००२ मध्ये बांधण्यात आला आहे. त्यामुळे तो आकाराने छोटा व अरुंद आहे. त्यावरून वाहनांची रहदारी वाढल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने ये-जा करीत असल्याने नवीन पनवेल आणि विचुंबेला जोडणाºया या पुलावर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे पुलाच्या पिलरला तडे गेले आहेत. काही ठिकाणी सळई उघड्या पडलेल्या आहेत, तसेच दोन्ही बाजूचे रस्ते काही ठिकाणी खचल्याचे दिसून येते.विचुंबे ग्रामपंचायतीच्या वतीने या पुलाची नियमित डागडुजी केली जाते. मात्र, त्यानंतरही हा रस्ता खचत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, रस्ता खचल्याने विचुंबे ग्रामपंचायतीने येथील अवजड वाहतूक बंद केली आहे, तसेच काही सूचनाफलक लावण्यात आले आहेत. याशिवाय तात्पुरते हाइट गेज लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे.नवीन पनवेल-विचुंबे पुलाकरिता विचुंबे ग्रामपंचायतीकडून गेली तीन वर्षे पाठपुरावा सुरू आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला असलेला रस्ता खचला आहे. तो आम्ही वारंवार दुरु स्त केला आहे. लवकरच या पुलाची पुनर्बांधणी करावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.- विनायक भोईर,सहायक माहिती अधिकारी, ग्रामपंचायत, विचुंबेनवीन पुलाला मंजुरीविचुंबे एमएमआरडीएच्या अखत्यारित येत आहे. नवीन पनवेल-विचुंबे जोडपुलाची दुरवस्था झाल्याने याबाबत शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी विधान परिषदेत आवाज उठवला होता. तसेच स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनीसुद्धा याविषयी पाठपुरावा केला होता. काही महिन्यांपूर्वी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणी करून याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार एमएमआरडीएकडून तीन कोटी रु पये खर्चाच्या नवीन पुलाला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध होऊन कामाला सुरु वात होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई