शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वाशीसह सीबीडीतून वाहनचोरांना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:38 IST

शहराबाहेरील टोळ्या सक्रिय; नागरिकांच्या दक्षतेमुळे प्रकार उघड

नवी मुंबई : वाहनचोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन वेगवेगळ्या टोळ्या पोलीसांच्या हाती लागल्या आहेत. दोन्ही टोळ्या शहराबाहेरील असून वाहनचोरीच्या उद्देशाने नवी मुंबईत यायचे. त्यांच्याकडून वाशी व सीबीडी परिसरात वाहनचोरी केली जात असतानाच त्यांना पकडण्यात आले.शहरात घडत असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यात शहराबाहेरील टोळ्या सक्रिय असल्याचे दिसुन येत आहे. अशा दोन टोळ्या नवी मुंबई पोलीसांच्या हाती लागल्या आहेत. सिबीडी व वाशी येथून त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. सिबीडी सेक्टर ६ येथे राहणारया हरपिंदर सिंग यांची स्कॉर्पिओ कार बुधवारी रात्री सोसायटीबाहेर रस्त्यावर उभी होती.रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा हरप्रित सिंग हा कामानिमित्ताने कार घेवून जाण्यासाठी त्याठिकाणी आला. यावेळी काहीजन कारच्या आतमध्ये बसलेले असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. यामुळे त्याने मित्रांना त्याठिकाणी मदतीसाठी बोलवले. त्यांनी कारमधील व्यक्तींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एकाला त्यांनी पाठलाग करुन पकडले. त्याला घेवून ते पुन्हा कारजवळ आले असता, कार मध्ये लपलेला इतर एकजन त्यांना आढळून आला. त्यानुसार या दोघांना पकडून पोलीसांच्या हाती देण्यात आले. चौकशीत अब्दुल शेख (४५) व रुस्तुम खान (२७) अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले. पकडलेले दोघेही गोवंडीचे राहणारे असून पळालेले त्यांचे साथीदार देखिल त्याच परिसरातील गुन्हेगार आहेत.त्याच रात्री वाशी सेक्टर १४ मधून इनायतुल्ला रहेमतुल्ला शहा (३१) याला अटक करण्यात आली आहे. तो घाटकोपरचा राहणारा असून गॅरेजमध्ये कामाला आहे. इतर पाच साथीदारांसह तो सेक्टर १४ येथे कार चोरीसाठी आले होते. यावेळी तिथे रस्त्यावर उभ्या असलेल्या जयवंत यमगर यांची इनोव्हा कार चोरण्याचा प्रयत्न ते करत होते. त्याच वेळी गस्तीवरील पोलीसांची त्यांच्यावर नजर पडली असता, इतरांनी तिथून पळ काढला असता शहा हा पोलीसांच्या हाती लागला. या दोन्ही टोळीकडून नवी मुंबईतील वाहनचोरीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्यानुसार याप्रकरणी वाशी व सीबीडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Arrestअटक