शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या कामकाजासाठी वाहनांची शोधाशोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 02:11 IST

ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत निवडणूक कार्यालये सुरू झाली आहेत

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे काम जोमात सुरू आहे. त्यासाठी विविध भरारी पथके तैनात आहेत. निवडणुकीच्या या कार्यालयीन कामकाजासाठी सुमारे २५० वाहनांची आवश्यकता आहे. मात्र, अद्यापपर्यंत केवळ १७१ वाहनांचा पुरवठा तिन्ही लोकसभा मतदारसंघांच्या कार्यालयीन कामकाजासाठी झाला आहे. उर्वरित वाहनांसाठी शोधाशोध सुरू आहे.

ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत निवडणूक कार्यालये सुरू झाली आहेत. त्यासाठी जिल्हा पातळीवरील कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि साहित्य वाहतूक आदींसाठी लागण्याऱ्या अत्यावश्यक वाहनांची जुळवाजुळव केली जात आहे. सद्य:स्थितीला विविध कामांसाठी आयएएस अधिकारीही जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी या वाहनांची आवश्यकता आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १८ विधानसभा कार्यक्षेत्रांतील कार्यालयांसाठी १७१ वाहनांचा पुरवठा जिल्हा वाहनव्यवस्था पथकाकडून झाला आहे. याशिवाय, आणखी १५० वाहनांची आवश्यकता असून तशी मागणी संबंधित कार्यालयांकडून केली जात आहे.जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या निवडणूक कार्यालयीन अधिकाऱ्यांना वाहनांची उपलब्धता सध्या प्राधान्याने करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता जिल्ह्यातील तीन प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयांवर या वाहनांच्या उपलब्धतेची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडून जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचा शोध घेतला जात आहे. प्राप्त होणाºया वाहनांची योग्य ती तांत्रिक तपासणी केली जात आहे. त्यानंतर, संबंधित वाहनांचा मागणीनुसार पुरवठा करण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी ठाणे, वाशी आणि कल्याण येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांंकडून वाहनांचा शोध सुरू आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार वाहने लवकरच उपलब्ध होतील, असे जिल्हा वाहनव्यवस्थापन कक्षाकडून सांगितले जात आहे.साडेसहा हजार वाहनांची जुळवाजुळवजिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रांतील कार्यालयांसह ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा कार्यालयीन कामकाजासाठी सुमारे २५० वाहने उपलब्ध होत आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील सहा हजार ४८८ मतदानकेंद्रांसह आता नव्याने वाढणाºया साहाय्यकारी मतदानकेंद्रांवरील सुमारे ४७ हजार अधिकारी, कर्मचाºयांना मतदानाच्या आदल्या दिवसापासून वाहने उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. यासाठी सुमारे सहा हजार ७६३ वाहनांची आवश्यकता भासणार आहे. भिवंडीत मतदानकेंद्रांसाठी सुमारे दोन हजार २०० वाहनांसह कल्याण मतदारसंघासाठी दोन हजार ६३ आणि ठाण्यात मतदानाच्या दिवसाकरिता दोन हजार ५०० वाहनांची जुळवाजुळव सुरू आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभा