शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीतील स्मशानभूमीला वाहनांचा गराडा; महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 23:55 IST

पार्किंगचा अभाव : अंत्यविधीसाठी ग्रामस्थांची होतेय कसरत

अनंत पाटील नवी मुंबई : महापालिकेच्या घणसोली विभाग कार्यालयासमोर असलेल्या स्मशानभूमीला वाहनांचा गराडा पडलेला असतो. परिसरात वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा नसल्याने वाहनधारक स्मशानाच्या प्रवेशद्वारावरच वाहने उभी करतात. विशेष म्हणजे तिन्ही मार्गांवर वाहने पार्क केली जात असल्याने अंत्यविधीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा मृतदेह खांद्यावर घेऊन ताटकळत उभे राहावे लागते. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून स्मशानभूमीच्या परिसरातील बेकायदा पार्किंगला आळा घालण्याची मागणी केली आहे.

सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या घणसोली गावात महापालिका विभाग कार्यालयाला लागूनच जुनी स्मशानभूमी आहे. महिन्याला पंधरा ते वीस मृतदेहांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. तसेच विभाग कार्यालयात विविध कामांनिमित्त दररोज शेकडो लोक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. या कार्यालयाच्या समोरच महापालिकेचा पाण्याचा जलकुंभ आहे. दळणवळणाची सोय म्हणून या परिसरातील तिन्ही मार्गांवर नो पार्किंग क्षेत्राचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र या फलकांकडे दुर्लक्ष करीत सर्रासपणे चार चाकी व दुचाकी वाहने उभी केली जातात. अनेकदा रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केली जातात. त्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतूककोंडीची समस्या भेडसावते.

वाहनतळ नसल्याने स्मशानभूमीला नेहमी वाहनांचा विळखा पडल्याचे दृश्य पाहावयास मिळते. अनेकदा ही वाहने स्मशानभूमीतसुद्धा पार्क केल्याचे दिसून येते. त्यामुळे अंत्यविधी करताना ग्रामस्थांची कसरत होत आहे. स्मशानात उभ्या केलेल्या अस्ताव्यस्त वाहनांचा अडथळा पार करून मृतदेह नेताना ग्रामस्थांना संताप अनावर होत आहे. वाहनांच्या पार्किंगला एकही वाहनतळ उपलब्ध नसल्याने या ठिकाणी येणारी दुचाकी, चार चाकी वाहने रस्त्यांच्या दुतर्फा उभी केली जातात. त्यामुळे या भागात नेहमीच वाहतूककोंडी होते. नवी मुंबई वाहतूक पोलीस शाखेने अशा नो पार्किंगमधील वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. महापालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पार्किंगची सुविधा नसल्यामुळेच याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई