शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत वासुदेव आला, स्वच्छतेचा संदेश दिला; नऊ महिन्यांनंतर दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 01:58 IST

शुक्रवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घणसोली गावच्या गावदेवी मंदिरापासून ‘वासुदेव आला हो.. वासुदेव आला,’ म्हणत वासुदेवाचे स्वच्छतेचा संदेश देतो

नवी मुंबई : ‘वासुदेव आला हो.. वासुदेव आला’ असं म्हणत पहाटेच्या गुलाबी थंडीत वासुदेव दाराशी आला. भगवा डगला, भगवं धोतर, मोरपिसं लावलेली त्रिकोणी टोपी. त्या टोपीला रुद्राक्षांच्या माळा गुंडाळलेल्या. कपाळावर एक पांढरा आकडा. आकड्याच्या मध्ये शेंदरी टिळा अशा वेषभूषेतील वासुदेवाचे नऊ महिन्यांनंतर शुक्रवारी नवी मुंबईकरांना दर्शन झाले.

शुक्रवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घणसोली गावच्या गावदेवी मंदिरापासून ‘वासुदेव आला हो.. वासुदेव आला,’ म्हणत वासुदेवाचे स्वच्छतेचा संदेश देत आपल्या पहाडी आवाजात टाळ आणि चिपळ्यांची साथ देत दारोदारी हिंडताना दर्शन झाले. स्वच्छतेचा संदेश जगभरात पोहोचविणारे संत गाडगेबाबा, महात्मा गांधीजी यांच्या नावाचा उल्लेख करून ताई, माई, आई, दादा, बाबा करीत संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माउली यांच्या अभंगांच्या चालीवर वासुदेव संदेश देत होता. 

ना घर, ना दार, भटके समाज म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी गावागावांत पहाटे चार वाजताच्या ठोक्याला पोचावे लागते तेव्हा आमच्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरते, असेही वासुदेवाने सांगितले.

समाजाची झाली दशापूर्वीच्या काळात अंगणात वासुदेव आला की, भाग्याची गोष्ट मानली जात असे. कारण त्या रूपाने श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे, अशी काही लोकांची धार्मिक भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात वासुदेव हा समाजप्रबोधन करणारा समाज अशी त्यांची ओळख होती. परंतु आज या समाजाची पार दशा झाल्याचे वासुदेवाने सांगितले.

गाण्यातून लोकप्रबोधन मराठवाड्याच्या ग्रामीण भागातून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या वासुदेवाने आपले घरदार आणि शहर स्वच्छ ठेवण्याचे गाण्यातून लोकप्रबोधन करत पालिकेच्या स्वच्छता अभियानाला हातभार लावला.