शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत रंगला ‘सखी महोत्सव २०१७’

By admin | Updated: April 25, 2017 01:23 IST

लोकमत सखी मंच आयोजित पॉवर बाय बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स सखी महोत्सव २०१७ मोठ्या उत्साहात पार पडला.

नवी मुंबई : लोकमत सखी मंच आयोजित पॉवर बाय बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स सखी महोत्सव २०१७ मोठ्या उत्साहात पार पडला. शनिवारी वाशीतील शिवविष्णू मंदिर सभागृहात झालेल्या महोत्सवाला महिलावर्गाचा उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी मेहंदी, वेषभूषा, ब्रायडल मेकअप तसेच एकल नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बिर्ला सनलाइफ इन्शुरन्सच्या वतीने स्वाभिमान या विशेष मोहिमेंतर्गत महिलांना सशक्तीकरणाचे धडे देण्यात आले.सखींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धाआणि आकर्षक बक्षिसांची लयलूट हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. कला, नृत्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. यामध्ये कोरिओग्राफर प्रबुध कदम, दीपक चारी, दैवतामाने या परीक्षकांचा समावेश होता. एकल नृत्याकरिता ५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. या स्पर्धेत विद्या घारे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर तन्वी हारका यांनी दुसरा क्रमांक आणि विद्या अदमान यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. ब्रायडल मेकअपसाठी स्पर्धकांना अर्ध्या तासाचा कालावधी देण्यात आला होता. या स्पर्धेत अलका गोविंद या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या तर नयना शर्मा द्वितीय आणि मयुरी यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. मेहंदी स्पर्धेत राजश्री नायडू यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर कीर्ती बागुल यांनी द्वितीय आणि सुवर्णा धारिया यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. वेषभूषा स्पर्धेत वैशाली मुके यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर प्रणिता मालेकर यांना दुसऱ्या आणि अनिता माळी यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या कार्यक्रमात लोकमत सखी मंच परिवारातील महिला सभासदांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत विविध कला सादर केल्या. सखी मंचच्या माध्यमातून मिळालेल्या व्यासपीठामुळे सखींनी लोकमतचे विशेष आभार मानले. कार्यक्रमादरम्यान बिर्ला सनलाइफ इन्शुरन्सच्या वतीने स्वाभिमान ही विशेष मोहीम राबविण्यात आली. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल. कुटुंबाला आर्थिक हातभार लावून स्वावलंबनाचे धडे देण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी स्वत:चे अनुभव मांडत इतर महिलांना करिअर घडविण्याची प्रेरणा दिली. उपस्थित महिलांसाठी विशेष लकी ड्रॉ तसेच प्रश्नमंजूषाच्या माध्यमातून बक्षिसे जिंकण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती. बिर्ला सनलाइफच्या वतीने महिलांना प्रेरणा देण्याकरिता विशेष चित्रफीत या ठिकाणी दाखविण्यात आली. या समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांना सशक्तीकरणाचे धडे देत एक उत्तम करिअर घडविण्याचा मोलाचा सल्ला दिला. चैतन्य जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.