शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

वाशीतील पदपथ फेरीवाल्यांच्या विळख्यात; पादचाऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:11 IST

कारवाईकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

नवी मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, फेरीवाल्यांकडून पदपथ तसेच रस्ते बळकावले जात असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशाच प्रकारातून वाशी परिसरातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असतानाही कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.वाशी परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सरसकट अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून परिसर स्वच्छ केला होता. मात्र, त्यांच्या बदलीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी रस्ते व पदपथ बळकावल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम पादचाऱ्यांसह वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. वाशी सेक्टर ९ परिसरात अशाच प्रकारातून सतत वाहतूककोंडी होत असते, तर प्रत्येक रविवारी तिथल्या रस्त्यांवर बाजार भरू लागला आहे. फेरीवाल्यांवर वेळीच कारवाई न केल्यास भविष्यात पदपथांपाठोपाठ रस्तेदेखील फेरीवाल्यांच्या घश्यात जाण्याची भीती वर्तविली जात आहे. व्यावसायिक गाळ्यांच्या बाहेरही हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडून मार्जिनल स्पेसवर साहित्य मांडले जात असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. विभाग कार्यालयाच्या परिसरात हे दृश्य नजरेस पडत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.