शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इमारतींच्या पुनर्बाधणीभोवती फिरतेय वाशीतील निवडणूक; गावठाण, होल्डिंग पाँडसह समस्यांवर लक्ष

By नामदेव मोरे | Updated: January 10, 2026 10:32 IST

नवी मुंबईमधील महत्त्वाच्या विभागांमध्ये वाशीचा समावेश होतो. मुंबईचे प्रवेशद्वार असलेले वाशी गाव या विभागात येते.

- नामदेव मोरे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बाधणीच्या विषयावर वाशी विभागातील निवडणूक फिरत आहे. वाशीसह जूगाव या मूळ गावातील समस्या, वाहतूक कोंडीसह इतर प्रश्नांवर निवडणुकीत उमेदवारांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. उमेदवार निश्चितीपासून येथील तीन प्रभागांमध्ये हायहोल्टेज चुरस पाहावयास मिळत असून मोठ्या सभांपेक्षा घरोघरी व समाज माध्यमांवरील प्रचारावर उमेदवारांनी भर दिला आहे.

नवी मुंबईमधील महत्त्वाच्या विभागांमध्ये वाशीचा समावेश होतो. मुंबईचे प्रवेशद्वार असलेले वाशी गाव या विभागात येते. जूगावचा काही भाग व सिडको विकसित परिसरासह पामबीचवरील वसाहतींमध्ये विभागलेल्या तीन प्रभागामध्ये उमेदवारी निश्चितीपासून कमालीची चुरस होती. एका प्रभागातील उमेदवारी रद्द झालेल्या उमेदवाराने न्यायालयात धाव घेतल्याचा मुद्दाही गाजत आहे. सिडकोने बांधलेल्या इमारती धोकादायक झाल्या असून त्यांच्या पुनर्बाधणीच्या विषयावर येथील निवडणूक केंद्रिभूत झाली आहे. मतदारांसाठीही पुनर्बाधणी हाच जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. संपूर्ण निवडणूक या मुद्यावर केंद्रित झाली आहे. उमेदवारांनी सभा घेण्यापेक्षा घरोघरी प्रचारावर भर दिला आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोपामध्ये नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित आहेत. येथील होल्डिंग पाँडची स्वच्छता रखडली आहे. वाशी-कोपरखैरणे रस्ता, मोराज सर्कलवरील वाहतूक कोंडी या समस्याही गंभीर असून कोण उमेदवार प्रश्न सोडवणार की फक्त आश्वासनेच मिळणार, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. शिंदेसेना व भाजपमध्ये तीनही प्रभागांत चुरस असून आघाडीचे घटक पक्ष व अपक्षांनीही नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला आहे.

वाशीतील प्रमुख समस्यावाशी व जूगावमधील प्रकल्पग्रस्तांची घरे व इतर प्रश्न प्रलंबित आहेतवाशी - कोपरखैरणे रोडवर वाहतूककोंडीची समस्या गंभीरपामबीच रोडवरील मोराज सर्कलजवळ वाहतूककोंडीपाकिंगचा विषय गंभीर झाला असून रोडवर वाहने उभी करावी लागत आहेत.होल्डिंग पाँडमध्ये गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता कमी होत आहे.अनधिकृत फेरीवाले व मार्जिनल स्पेसमधील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची गैरसोय.

जलवाहिन्यांचे सुधारित जाळे गरजेचेइमारतींच्या पुनर्बाधणीबरोबरच मलनिस्सारण व जलवाहिनीचे सुधारित जाळे तयार करणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vashi election revolves around building redevelopment; focus on local issues.

Web Summary : Vashi's election focuses on building redevelopment, village issues, and traffic. Candidates prioritize door-to-door campaigns, addressing holding pond cleanliness, Vashi-Koperkhairane road congestion, and unauthorized vendors. Voters seek solutions, not just promises, from contenders in this competitive election.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६