शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वनराईत डेब्रिज माफियांचा धुमाकूळ

By admin | Updated: May 15, 2017 00:46 IST

शहरात डेब्रिज माफियांनी पुन्हा आपल्या कारवाया सुरू केल्या आहेत. खाडी किनारे, मोकळ्या मैदानानंतर आता या माफियांनी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात डेब्रिज माफियांनी पुन्हा आपल्या कारवाया सुरू केल्या आहेत. खाडी किनारे, मोकळ्या मैदानानंतर आता या माफियांनी घणसोलीतील वनराईकडे आले लक्ष केंद्रित केले आहे. याठिकाणी दिवसाला डेब्रिजच्या शेकडो गाड्या रिकाम्या केल्या जात आहेत. दिवसाढवळ्या चालणाऱ्या या प्रकाराकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने अर्थपूर्ण चुप्पी साधल्याने घणसोलीतील या वनराईचे अस्तित्व धोक्यात आले आहे.डेब्रिज माफियांना प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेने शहराच्या प्रमुख प्रवेशद्वारांवर भरारी पथके तैनात केली आहेत. शहरात डेब्रिजची वाहतूक करणे व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियमाने संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवाना नसलेल्या गाड्यांवर कारवाई करण्याचे निर्देश भरारी पथकांना देण्यात आले आहेत. परंतु या पथकांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने डेब्रिज माफियांचे चांगलेच फावले आहे. याचा परिणाम म्हणून सर्रासपणे विनापरवाना डेब्रिजची वाहतूक व विल्हेवाट लावली जात आहे. मागील काही दिवसांपासून या माफियांनी घणसोलीतील हिरव्यागार वनराईकडे लक्ष केंद्रित केले आहे.घणसोली गावालगत जुने सद्गुरू हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल सध्या बंद असले तरी त्याच्या मागील बाजूस विस्तीर्ण वनराई आहे. यात मोठमोठे वृक्ष आहेत. घणसोली नोडमधून गावात जाण्याचा मार्ग याच वनराईतून जातो. परंतु मागील काही दिवसांपासून या वनराईत मोठ्याप्रमाणात डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या जात आहेत. सध्या मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे सुरू आहेत. नाल्यातील उपसलेला गाळ ट्रकमध्ये भरून या वनराईत आणून टाकला जात आहे. शिवाय बांधकामातून निघणारे डेब्रिजचीही येथे डम्प केले जात आहे. वाशी, कोपरखैरणे, घणसोली या भागातून दरदिवशी ड्रेब्रिजने भरलेले शेकडो ट्रक या ठिकाणी रिकामे केले जात आहेत. त्यामुळे घणसोलीतील या वनराईच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.