शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाशीतील हरितपट्टा जाहिरातदाराला आंदण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:48 IST

वाशीतील रस्ते दुभाजकांवर विकसित केलेले हरितपट्टे जाहिरातदारांसाठी आंदण ठरले आहेत

नवी मुंबई : वाशीतील रस्ते दुभाजकांवर विकसित केलेले हरितपट्टे जाहिरातदारांसाठी आंदण ठरले आहेत. वाशी ते कोपरखैरणे दरम्यान सुमारे तीन किमी रस्त्याच्या दुभाजकावर महापालिकेने विविध जातीची रोपटी लावून हा संपूर्ण पट्टा सुशोभित केला आहे. परंतु त्याच वेळी हा संपूर्ण पट्टा देखरेखीच्या नावाखाली एका खासगी व्यावसायिक कंपनीला दिला आहे. संबंधित कंपनीने या पट्ट्यावर जाहिरातबाजी करण्यासाठी अंतराअंतरावर लोखंडी फलक लावले आहेत. त्यामुळे या हरितपट्ट्याच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे.महापालिकेने शहरात ठिकठिकाणी हरितपट्टे विकसित केले आहेत. वापराविना पडून किंबहुना कोणत्याही वापरास योग्य नसलेल्या मोकळ्या जागेवर हिरवळ विकसित करून तो परिसर सुशोभित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कामात सातत्य राहावे यासाठी खासगी व्यावसायिक व सामाजिक संस्थांना हे हरितपट्टे देखरेखीसाठी देण्यात आले आहेत. यात हॉटेल्स, हॉस्पिटल्स बिल्डर्स आणि इतर व्यावसायिकांचा समावेश आहे. वाशी ते कोपरखैरणे मार्गावर वरिष्ठा हॉटेल चौक ते ब्लू डायमंड चौकापर्यंतचा पट्टा कोपरखैरणेतील स्नेहसाईदीप हॉस्पिटलने देखरेखीसाठी घेतला आहे. त्यानुसार या संपूर्ण पट्ट्यात ठिकठिकाणी हॉस्पिटलच्या नावाचे फलक लावले आहेत. ब्लू डायमंड ते शिवाजी चौकापर्यंतच्या पट्ट्यात मागे लखानी बिल्डर्सचे जाहिरात फलक लागले होते. परंतु अलीकडेच झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणानंतर हे फलक काढून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी नवीन फलक लावले आहेत. हे फलक सध्या कोरे असून ते कोणत्या एजन्सीला दिले आहेत, याबाबत नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण फुटा- फुटाच्या अंतरावर लावलेल्या या फलकामुळे हरितपट्ट्यातील रोपटी गायब झाली आहेत.एकूणच हा हरितपट्टा रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी आहे, की फुकट्या जाहिरातबाजीसाठी असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.