शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या रुग्णालयांत आजपासून २४ तास लसीकरण; केंद्रांची संख्या वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 02:02 IST

नवी मुंबईत १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मंगळवारपर्यंत  ३३,०६९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.  १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला १ मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे. सध्या महापालिकेच्या वाशी, नेरूळ आणि ऐरोली या तीन रुग्णालयातील केंद्रात लस दिली जात आहे. अधिकाधिक नागरिकांना लस घेता यावी, या उद्देशाने ११ मार्चपासून या तिन्ही केंद्रांत २४ तास लसीकरण केले जाणार आहे. तसेच केंद्राच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

नवी मुंबईत १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मंगळवारपर्यंत  ३३,०६९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.  १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यात आले आहे.  तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिक तसेच सहव्याधी असणारे ४५ ते ५९ वर्षं वयाच्या नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणासाठी सकाळी ९ ते सांयकाळी ५ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. परंतु विविध कारणांमुळे नोकरीधंद्यावर असणाऱ्यांना या वेळेत लस घेता येत नाही. त्यामुळे लसीकरणासाठी केंद्र आणि वेळ वाढवावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेच्या तिन्ही रुग्णालयात गुरुवारपासून २४ तास लसीकरण होणार आहे. 

नऊ आरोग्य केंद्रांतही सुरू सध्या वाशी, नेरूळ आणि ऐरोली या तीन महापालिकेच्या रुग्णालयांसह अकरा खासगी रुग्णालयांत आठवड्याचे सहा दिवस लसीकरण केले जात आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या चार आरोग्य केंद्रांत आठवड्यातील तीन दिवस म्हणजेच सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी लस दिली जात आहे. परंतु लसीकरणाला गती मिळावी तसेच अधिकाधिक लोकांना लस घेता यावी, या अद्देशाने सीबीडी, कुकशेत, करावे, शिरवणे, जुहूगाव, घणसोली, ऐरोली, दिघा व इलठाणपाडा या नऊ नागरी आरोग्य केंद्रातसुद्धा लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात सध्या २७ लसीकरण केंद्र सुरू असून,  येत्या काळात ही संख्या ३२ पर्यंत नेण्याचा मनोदय आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCorona vaccineकोरोनाची लस