शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत पाच केंद्रांवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:53 IST

१९ हजार ८५ जणांची नोंद : आणखी ५० लसीकरण केंद्रांची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये आज, शनिवारपासून लसीकरण सुरू होणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड काळात आरोग्यविषयक सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी आरोग्यकर्मी कोविड योद्धयांना लसीकरण केले जाणार असून, शहरातून सुमारे १९ हजार ८५ कोविड योद्धयांची नोंद महापालिकेकडे झालेली आहे.

कोविन ॲपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांचे लसीकरण कोणत्या केंद्रावर, कोणत्या तारखेला व वेळेत होणार आहे याचा संदेश मोबाईलवर प्राप्त होणार असून, प्रत्येक केंद्रावर दर दिवशी १०० व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे. नवी मुंबई पालिकेस २१ हजार लस प्राप्त झालेले असून, पालिकेची वाशी व ऐरोली ही दोन सार्वजनिक रुग्णालये, तसेच नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सी.बी.डी. बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटल, तसेच खैरणे एम.आय.डी.सी. येथील रिलायन्स हॉस्पिटल अशी पाच लसीकरण आरंभ केंद्रे निश्चित आहेत. तसेच पालिका क्षेत्रात ५० लसीकरण केंद्रांची तयारी करण्यात असून, त्या ठिकाणी आवश्यक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

पनवेल पालिकेत तीन ठिकाणी लसीकरणn पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शनिवारपासून कोविड लसीकरणाला सुरुवात होणार आहे.  n एमजीएम, कामोठे व येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयात सकाळी ९ ते ५ दरम्यान हे लसीकरण होणार आहे. पालिकेला दोन हजार लसींचा पुरवठा झाला असल्याची माहिती उपायुक्त विठ्ठल डाके यांनी दिली. n प्राथमिक आरोग्य केंद्रात लसींचा साठा ठेवण्यात आलेला आहे. आरोग्य विभागातील ५,२३५ जणांनी पालिकेकडे नोंद केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCorona vaccineकोरोनाची लस