शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या भूखंडांना डबक्याचे स्वरूप, काही प्रमाणात गवतही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 01:22 IST

महापालिका व सिडकोने योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीत अनेक भूखंड मोकळेच आहेत. सदर भूखंडांच्या विकासाकडे सिडकोने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भूखंडांवर गवताचे जंगल वाढले आहे. आता पावसाळ्यात या भूखंडांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याचा त्रास आजूबाजूच्या सोसायट्यांना होऊ लागला आहे. याबाबत महापालिका व सिडकोने योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.कळंबोली, रोडपाली, कामोठे, खारघर, खांदा वसाहत या ठिकाणी महापालिका क्षेत्र असले, तरी मोकळे भूखंड अद्याप सिडकोच्या ताब्यात आहेत. या मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने भूखंडांचे अस्तित्व संपले आहे, तसेच या जागेवर डेब्रिज व कचरा टाकला जात आहे. त्यामुळे उंदीर, घुशी व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा येथे वावर वाढला आहे. या प्राण्यांचा उपद्रव शेजारच्या वसाहतींना होत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने सायंकाळी जास्त उपद्रव करतात. कळंबोली सेक्टर येथील ११ भारत पेट्रोल पंपाजवळील भूखंडावरही पावसाचे पाणी साचले आहे. या जागेवर कचरा, झाडांच्या तुटलेल्या फांद्या टाकण्यात आल्या आहेत. पावसाच्या पाण्यामुळे या फांद्या कुजल्या आहेत. त्यामुळे त्यातून दुर्गंधी येत आहे. कामोठे सेक्टर ८ या ठिकाणीही पावसाचे पाणी साचल्याने बाजूला राहात असलेल्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिका व सिडकोने संबंधित जागा मालकाला सूचना कराव्यात, तसेच सिडकोने आपल्या मालकीच्या भूखंडांची निगा राखावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.>साथीच्या रोगांची भीती : आगोदरच कोरोनाचे संकट आहे. यात पावसाळ्यात उद्भवणाºया साथीच्या रोगांनीही तोंड वर काढले आहे. मोकळ्या भूखंडांवर साचलेले पाणी, घनकचºयामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू व इतर साथीच्या रोगांची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.