शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष प्राधिकरणाचे महासभेत वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 02:51 IST

शासन निर्णयानुसार वृक्षलागवडीसाठी महापालिकेकडून वनविभागाला निधी देण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. वन विभागात अनेक घोटाळे असल्याने त्यांच्यामार्फत वृक्षलागवड करण्याऐवजी पालिकेनेच हे काम करावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

नवी मुंबई : शासन निर्णयानुसार वृक्षलागवडीसाठी महापालिकेकडून वनविभागाला निधी देण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. वन विभागात अनेक घोटाळे असल्याने त्यांच्यामार्फत वृक्षलागवड करण्याऐवजी पालिकेनेच हे काम करावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. तर अनेक ठिकाणी वृक्षतोड होत असतानाही वृक्ष प्राधिकरण त्याकडे डोळेझाक करत असल्याचाही संताप लोकप्रतिनिधींनी सभागृहात व्यक्त केला.आगामी पावसाळ्यात महापालिकेकडून एक लाख एक हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. राज्य शासनाकडून राबवल्या जात असलेल्या वृक्षलागवड अभियानाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार इलठाणपाडा, रबाळे व महापे येथे २५ हजार, सायन-पनवेल मार्गालगत सहा हजार, तर मोरबे धरणाभोवती ७० हजार झाडे लावली जाणार आहेत, त्याकरिता एकूण ११ कोटी ७५ लाख ७४ हजार ५०० रुपये खर्चाची अपेक्षा आहे. या खर्च मंजुरीचा प्रस्ताव शुक्रवारी महासभेत आला असता, वृक्ष प्राधिकरण विभागाच्या लोकप्रतिनिधींनी वाभाडे काढले. आजवर लावलेल्या वृक्षांचे संवर्धन होत नसून, बेकायदा सुरू असलेल्या जुन्या वृक्षतोडीकडेही वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा संताप माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केला. त्यामुळे आजवर किती झाडे लावली, त्यापैकी किती झाडे जिवंत आहेत, याची आकडेवारीही त्यांनी सभागृहात मागितली.अनेक ठिकाणी जुनी झाडे तोडून त्या ठिकाणी नवी झाडे लावली जात असल्याचाही संशय त्यांनी व्यक्त केला. महापौर बंगला परिसरातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली असल्याचे ते म्हणाले. तर पालिकेकडे स्वत:ची जागाच शिल्लक नसल्याने नेमकी वृक्षलागवड कुठे होते, याच्याही चौकशीची त्यांनी मागणी केली. नगरसेवक गणेश भगत यांनी एनआरआय कॉम्पलेक्सच्या मागील बाजूस लावलेली झाडे पाण्याअभावी जळून गेल्याचीही बाब उघडकीस आणून दिली. या वेळी नगरसेवक देविदास हांडेपाटील यांनी वृक्षलागवडीसाठी वन विभागाला पैसे का द्यायचे, असा प्रश्न उपस्थित केला. वन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत असल्याने त्यांनी निधी देण्यास विरोध दर्शवला. पालिकेची स्वत:ची यंत्रणा असल्याने ही वृक्षलागवड पालिकेनेच करण्याचीही मागणी त्यांनी केली. या वेळी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, नगरसेवक प्रशांत पाटील, रामदास पवळे यांनीही वृक्ष प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहनेते रवींद्र इथापे यांनी ‘फिफा’च्या वेळी शहरात मार्गालगत, चौकांमध्ये लावलेली झाडे, लॉन यांची दयनीय अवस्था असल्याचे सांगितले. तसेच यापूर्वी गवळी देव परिसरात वृक्षलागवडीवर केलेल्या खर्चाचा हिशोब मागितला. त्यानुसार महापौर जयवंत सुतार यांनी वृक्षलागवडीच्या कामाचे पालिकेने निरीक्षण करण्याच्या सूचना देत, मोरबे धरणालगत वृक्षलागवड वगळून प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी दिली.