शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

व्ही.राधा यांच्या बदलीचे वारे

By admin | Updated: May 9, 2016 02:38 IST

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांच्यापाठोपाठ आता सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा यांच्याही बदलीचे वारे वाहू लागले आहेत

नवी मुंबई : सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांच्यापाठोपाठ आता सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा यांच्याही बदलीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सिडकोतील अनेक प्रकल्पांची गती मंदावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या महिन्यात संजय भाटीया यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या २२ मे रोजी व्ही. राधा यांचा सिडकोतील कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे त्यांचीही बदली अटळ मानली जात आहे. कठोर शिस्तीच्या प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या व्ही. राधा यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात आपल्या कामाची चुणूक दाखविली. विशेषत: आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भूसंपादनाच्या कामात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. भूसंपादनाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना सकारात्मक करण्यासाठी त्यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्याचप्रमाणे साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेतील भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी त्यांनी कठोर उपाययोजना आखल्या. साडेबारा टक्के विभागातील दलाल आणि बिल्डरांचा हस्तक्षेपाला चाप लावला.सिडकोबरोबरच्या कराराचे उल्लंघन करणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे भूखंड वाटप रद्द करण्याची त्यांनी धडक कारवाई केली. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचे प्रकल्पग्रस्तांतून कौतुक होत आहे. प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी कमालीची यशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी व्ही. राधा यांना पूर्ण मोकळीक दिल्याने त्यांनी विविध स्तरांवर आपल्या कामाचा ठसा उमटविला. असे असले तरी यापुढे सिडकोत त्यांना काम करण्याची मोकळीक मिळेलच असे नाही. अशा परिस्थितीत त्या स्वत: सिडकोत अधिक काळ राहणार नाहीत, असा अंदाज वर्तविला जात आहे. राधा यांचा सिडकोतील कार्यकाळ संपुष्टात आल्याने शासकीय नियमाप्रमाणे बदली होणे अटळ आहे. (प्रतिनिधी)