शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

उस्मान रोहेकर यांचे उपोषण मागे

By admin | Updated: May 4, 2017 06:07 IST

कुंडलिका नदी पूररेषेत सुरू असलेल्या हाफिज इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नियमबाह्य इमारत बांधकामावर

रोहा : कुंडलिका नदी पूररेषेत सुरू असलेल्या हाफिज इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नियमबाह्य इमारत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन बुधवारी रोहा अष्टमी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी दिले. त्याचबरोबर गटनेते महेंद्र दिवेकर यांनी केलेली शिष्टाई आणि मुख्याधिकारी रोहा यांच्या लेखी पत्रानंतर उस्मान रोहेकर यांनी नियमबाह्य बांधकामांविरोधात बुधवारी पालिकेच्या आवारात सुरू केलेले आमरण उपोषण सायंकाळी थांबविले.नगरपरिषदेच्या जिजाऊ माता महिला बचत गट भवनशेजारी हाफिज इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने पर्ल पार्ककॉम्प्लेक्स नाव असणाऱ्या इमारतीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे बांधकाम पूररेषेत असून या बांधकाम कंपनीने पाटबंधारे विभागाकडून नगरपरिषदेकडे नाहरकत दाखला सुपूर्द केलेला नाही. हे बांधकाम पूररेषेत अर्थातच धोकादायक जागेत सुरू असल्याने नगरपरिषदेने संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे. असे असतानाही संबंधित कंपनीने सुरू असलेले नियमबाह्य बांधकाम बंद न करता जोमात सुरू ठेवून नगरपरिषदेच्या नोटीसला केराची टोपली दाखवली होती. त्यानंतर गटनेते महेंद्र दिवेकर, मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम बंद करण्याचे आदेश दिले असतानाही संबंधित बिल्डरने मात्र काम बंद केलेले नाही. संबंधित बिल्डरला नोटीस दिलेली असताना या इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यामुळे पालिका प्रशासन आणि बिल्डरचे साटेलोटे असल्याची शंका घेत उस्मान रोहेकर यांनी व्यक्त करीत मुख्याधिकारी रोहा यांनी हाफिज बिल्डरचा बांधकाम परवाना रद्द करावा, अशी मागणी करीत काँग्रेस नेते उस्मान रोहेकर यांनी बुधवारी नगरपरिषद आवारात आमरण उपोषण सुरू केले होते. रोह्यात बेकायदा बांधकामांच्या विरोधात सक्रि य सहभाग दर्शविणारे गटनेते महेंद्र दिवेकर यांनी केलेल्या शिष्टाईला अखेर यश आले आहे. मुख्याधिकारी रोहा यांनी कारवाईची लेखी हमी दिली आणि महेंद्र दिवेकर यांच्या हस्ते लिंबुपाणी घेऊन रोहेकर यांनी उपोषण थांबविले. (वार्ताहर) रोहा अष्टमी शहरात कुठल्याही नियमबाह्य व बेकायदा बांधकामांना पाठीशी घातले जाणार नाही. अशा बांधकामांवर ठोस कारवाई करण्यात येईल. -महेंद्र दिवेकर, गटनेते, नगरपरिषदनियमबाह्य बांधकाम करणाऱ्यांवर योग्य ती पुढील कारवाई करून उपोषणकर्त्यास उपोषणापासून परावृत्त करण्याबाबत आम्ही रोहा अष्टमी नगरपरिषदेला पत्र पाठवून कळविले. - सुरेश काशिद, तहसीलदार, रोहाशहरात राजरोसपणे सुरू असलेल्या नियमबाह्य बांधकामांना प्रशासनाचा प्रत्यक्ष वरदहस्त असल्यानेच बिल्डर बेकायदा कृत्य करतात. हाफिज बिल्डरवर कारवाई न झाल्यास पुनश्च उपोषण करणार.- उस्मान रोहेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते