नवी मुंबई : महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्या वापरणाऱ्या विक्रेत्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. घणसोली व वाशी परिसरातील ८ विक्रेत्यांवर कारवाई करून ४० हजार रूपये दंड वसुल केला आहे. कुठेही अशाप्रकारे प्लास्टीकचा वापर केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी पर्यावरणासाठी अत्यंत हानीकारक असणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्या वापरणाऱ्या विक्रेत्यांकडील पिशव्यांचा साठा जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाप्रमाणे घणसोली विभागाचे सहायक आयुक्त दिवाकर समेळ यांच्या नियंत्रणाखाली ५ दुकानदारांवर कारवाई करूनत्यांच्याकडून २५ हजार रूपये दंड वसुल केला आहे. यामध्ये सेक्टर ४ मधील चामुंडा किराणा ब्रदर्स, सेक्टर ३ मधील राज आॅईल डेपो, भवानी मिठाई व ड्रायफु्रट, गुलाब अँड सन्स, सेक्टर ७ मधील श्री क्षेत्रपाल या दुकानांवर कारवाई केली आहे. वाशी परिसरारमध्ये विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांच्या नियंत्रणाखाली सेक्टर २९ मधील आशापुरा सुपर मार्केट, अंबिका फुट शॉप, , न्यु भगवती सुपर मार्केट यांच्यावर कारवाई करून १५ हजार रूपये वसुल केले आहेत. शहरात सर्वत्र अशाप्रकारची मोहीम राबविली जाणार असून व्यापाऱ्यांनी प्रतिबंधात्मकक पिशव्यांचा वापर करू ने असे आवाहन केले आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर
By admin | Updated: August 7, 2016 03:21 IST