पनवेल : घरगुती गॅस सिलिंडर वापराबाबत अद्यापही ग्राहकांमध्ये जागरूकता दिसून येत नाही. अनेकांना गॅस गळतीबरोबरच सिलिंडरलाही ठरावीक मुदत देण्यात आलेली असते, याबाबत माहिती नसते. मुदत संपलेला सिलिंडर जिवंत बॉम्ब आहे. त्यामुळे सिलिंडर घेताना जागरुक राहण्याचे आवाहन शिवसेना ग्राहक कक्षाचे किरण तावदारे यांनी केले आहे. सिलिंडरच्या मुदतीचा विषय अद्याप चर्चेत आला नसला तरी, व्हॉट्सअॅपवरून या संबंधीची माहिती घरोघरी पसरत आहे. वितरकांकडून गॅसबचत, गळतीविषयी जागृती केली जाते. सिलिंडरच्या मुदतीबाबत अनेकांना ज्ञात नसते. ग्राहकांनी या विषयी आपल्या गॅस वितरकांशी खात्री करणे आवश्यक आहे. गॅस वापराबाबत जागरूकता निर्माण झाली नसल्यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्याचे तावदारे यांनी सांगितले. कांदिवली येथील सिलिंडर स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ग्राहक सरंक्षण कक्षाने जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. गृहिणींनी याबाबत अधिक जागृत असणे आवश्यक असल्याचे गॅस वितरकांचे म्हणणे आहे.
मुदत तपासूनच वापरा गॅस सिलिंडर
By admin | Updated: December 11, 2015 01:37 IST