शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पदयात्रा, गाठीभेटी, सोशल मीडियाचा वापर

By admin | Updated: May 12, 2017 02:03 IST

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचारास जोरदार सुरुवात केली आहे. प्रत्येक प्रभागात मतदारांच्या

मयूर तांबडे । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचारास जोरदार सुरुवात केली आहे. प्रत्येक प्रभागात मतदारांच्या बैठका व कोपरा सभांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी उमेदवार वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहेत. उमेदवारांनी प्रभागांमध्ये पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी प्रचारफेऱ्या काढून मतदारांना विविध मार्गाने आकर्षित करण्याचा सपाटाच लावला आहे. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्याने काहींनी आठ दिवस अगोदरपासूनच प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. दररोज, सकाळी आणि संध्याकाळी तीन तास, शनिवार आणि रविवार सुटीचा मुहूर्त साधून उमेदवारांनी प्रचारफेऱ्या काढून मतदारांशी संवाद साधत प्रचाराचा धूमधडाका सुरू ठेवला आहे.यंदा सोशल मीडियावरही प्रचाराचे वादळ उठले आहे. बहुतेक सर्व उमेदवारांनी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक अशा माध्यमाचा प्रभावी वापर केला आहे. विभागातील महत्त्वाच्या व्यक्तींद्वारे आपले संदेश वेगवेगळ्या ग्रुप्सपर्यंत पोहोचण्यापासून फोटो डेटाबेससारख्या सर्व अस्त्रांचा वापर पहिल्यांदाच इतक्या प्रभावीपणे होत आहे. अगदी छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारही सोशल मीडियाचा प्रभावी वापर करताना दिसत आहेत. प्रचाराची कोणतीही संधी इच्छुक सोडत नाहीत. मग त्यासाठी डिजिटलपासून अगदी घरोघरी जाऊन प्रचार करण्यात येत आहे. मतदारांवर छाप पाडण्याची इच्छुकांची हालचाल चालू आहे. पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत प्रचाराचे फंडे बदलत आहे.विरोधी पक्षाच्या हालचाली जाणून घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी डिटेक्टिव्ह एजन्सीचे दरवाजे ठोठावलेत. डिटेक्टिव्ह एजन्सींना एका दिवसासाठी ५ ते १0 हजार रु पये फी दिली की, विरोधी पक्षाच्या गोटात काय हालचाली सुरू आहेत, त्यांचे प्रचाराचे फंडे काय आहेत, आपल्या विरोधात कुठली कटकारस्थाने रचली जाताहेत, अशा एक ना अनेक गोष्टींची माहिती मिळते. ‘व्हॉटसअ‍ॅप’ वापरत नसणाऱ्या मतदारांना ‘एसएमएस’द्वारे संपर्क साधला जात आहे. बहुतांशी उमेदवारांच्या यादीत पत्रकारांचा समावेश हमखास असल्याने उमेदवारांच्या कार्यक्र मांची रूपरेषा घरबसल्या पत्रकारांना मिळत आहे. सोशल मीडियाचा हा मारा दुपारच्या वेळेत आणि रात्री उशिरा उमेदवार खुद्द पोस्ट करून करीत आहेत. कारण रखरखत्या या उन्हात प्रचारासाठी बाहेर पडण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे सकाळ, संध्याकाळच्या वेळेत घरोघरी संपर्क अभियानावर उमेदवारांनी भर दिला आहे.स्मार्ट सिटीकडे वाटचाल करू पाहणाऱ्या व प्रथमच होत असलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत ७८ जागांसाठी तब्बल ४१८ जणांनी भावी नगरसेवक बनण्यासाठी कंबर कसली आहे. प्रमुख समजल्या जाणाऱ्या शेकाप, काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी तिरंगी लढत होतेय. त्यात अन्य पक्ष आणि नाराज मंडळींनी सवतासुभा करून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. प्रत्येकाने प्रचारामध्ये अनोखे फंडे वापरण्यास प्रारंभ केला आहे. शहरात जिकडे पाहावे तिकडे वाहनांवर ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचाराने माहोल तापला आहे. इच्छुकांपैकी १५४ जणांनी माघार घेतल्याने ४१८ उमेदवार रिंगणात-पनवेल महापालिकेची निवडणूक येत्या २४ मे रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी ५७२ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. गुरुवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यादिवशी १५४ जणांनी जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता ४१८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने महाआघाडी आणि भाजपाच्या बंडखोरांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र या बंडखोरांची मनधरणी करण्यात दोन्ही पक्षांना यश आल्याने मोठ्या प्रमाणात बंडखोर थंड झाले आहेत. बंडखोरांमध्ये सर्वात जास्त संख्या भाजपाच्या कार्यकर्त्यांची होती. मात्र भाजपाचे नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी बंडखोरांशी वैयक्तिक संपर्क साधून विनवणी केल्यानंतर प्रयत्नांना यश आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील २० प्रभागात ७८ जागेसाठी ही लढत होत आहे.