शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीमध्ये उभारणार अद्ययावत पशू रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 22:55 IST

पनवेल परिसरात प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णालय उभारणे गरजेचे आहे.

वैभव गायकर।लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : कळंबोलीत पाळीव प्राण्यांबरोबरच मोकाट पशूपक्ष्यांसाठी अद्ययावत रुग्णालय उभे राहत आहे. सिडकोने काढलेल्या टेंडरला प्रतिसाद देत चार संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. अंतिमत: केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या पीपल फॉर अ‍ॅनिमल या संस्थेला हे भूखंड देण्यात आले आहेत. ही जागा सुमारे ८००० चौरस मीटरची असून रुग्णालय उभारण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पशू रुग्णालयासाठी भूखंड देताना सिडकोने कमीत कमी ५० टक्के प्राण्यांवर मोफत उपचाराची अट भूखंडांचे टेंडर काढताना ठेवली होती, अशी माहिती सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर यांनी दिली.

कळंबोलीमधील सेक्टर १६ मध्ये डी-मार्टच्या बाजूला हा भूखंड आहे. पीपल फॉर अ‍ॅनिमल ही संस्था टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णालयाची इमारत उभारणार आहे. रुग्णालयात लागणारे साहित्यही टाटा ट्रस्ट ही संस्था उपलब्ध करून देणार आहे. २०२१ पर्यंत रुग्णालयाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पनवेल परिसरात प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. मात्र, सध्याच्या घडीला असे एकही पशू निवारा केंद्र नसल्याची माहिती या वेळी आठ वर्षांपासून प्राण्यांसाठी काम करणारे प्राणिमित्र शैलेश खोतकर यांनी दिली.

जंगली पशूंनी पुन्हा जंगलात सोडण्यात येते. मात्र, बैल, गाय, घोडा, गाढव, कुत्रा या मोठ्या प्राण्यांना कुठे ठेवणार? याकरिता प्राण्यांसाठी निवारा केंद्रांची उभारणी करणे गरजेचे मत यावेळी खोतकर यांनी व्यक्त केले.