शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त चालकांचे परवाने निलंबित

By admin | Updated: July 5, 2016 02:51 IST

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलीस व आरटीओतर्फे कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. त्यांच्यातर्फे संयुक्तरीत्या करण्यात आलेल्या ६७७ कारवायांपैकी

- सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलीस व आरटीओतर्फे कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. त्यांच्यातर्फे संयुक्तरीत्या करण्यात आलेल्या ६७७ कारवायांपैकी ४१९ बेशिस्त चालकांचे वाहनचालक परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर २५८ प्रकरणांची अद्याप सुनावणी बाकी आहे.पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी शासन निर्देशानुसार बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न आरटीओ व वाहतूक पोलीस यांच्याकडून संयुक्तरीत्या होत आहे. त्याकरिता गेली तीन महिन्यांपासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. सिग्नल तोडणे, सीट बेल्टचा वापर न करणे, हेल्मेट न वापरणे, मद्यपान करून वाहन चालवणे, वेगमर्यादा ओलांडणे, वाहन चालवताना फोनचा वापर करणे अशा अनेक शीर्षकाखाली या कारवाया होत आहेत. अनेकदा चालकाच्या बेशिस्तपणामुळे गंभीर अपघात घडत असतात. त्यामध्ये निष्पाप प्रवासी किंवा पादचाऱ्यांना प्राण गमवावे लागतात. यामुळे राज्यातले अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता बेशिस्त चालकांविरोधात तीव्र कारवाई करून त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे धडे गिरवून घेतले जात आहेत. वाहतूक पोलिसांतर्फे यापूर्वी देखील अनेकदा मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात कारवाया केलेल्या आहेत. सद्यस्थितीला तरुणांमध्ये दुचाकीवर धूम ठोकण्याचे प्रमाण अधिक असून अनेक अपघातांमध्ये अशा तरुणांचा बळी गेलेला आहे. यामुळे महाविद्यालयीन तरुणांना शिस्त लावण्याकरिता देखील वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. यानंतरही शहरात वाहनचालकांचा बेशिस्तपणा दिसून येत आहे. अशांविरोधात पुन्हा एकदा कारवाईची मोहीम उभारून ठिकठिकाणी पथकांच्या माध्यमातून बेशिस्त चालकांचा शोध घेतला जात आहे. यानुसार मागील तीन महिन्यात ८७७ जणांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. त्यापैकी ४१९ जणांचे वाहनचालक परवाने ९० दिवसांकरिता निलंबित केल्याचे आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले. तर २५८ प्रकरणे प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.अनेकदा अवैध प्रवासी वाहतूक केल्यामुळे किंवा मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक केल्यामुळे देखील अपघात होत असतात. अशांवर देखील आरटीओने कारवाईचा दणका लावला आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत झालेल्या कारवायांमध्ये दंड स्वरूपात ३९ लाख ५२ हजार रुपये आरटीओकडे जमा झाले आहेत.