शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत एकाच वेळी ६९ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी प्रकल्पग्रस्तांना डावलल्याचा युनियनचा आरोप

By कमलाकर कांबळे | Updated: December 28, 2023 19:36 IST

बदल्या केलेल्यांत कार्यालयीन सहायक आणि लिपिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्याप्रमाणे शिफाई, सफाई कर्मचाऱ्यांच्यासुद्धा बदल्या केल्या आहेत

नवी मुंबई : सिडकोच्या आस्थापनेवर विविध विभागांत काम करणाऱ्या तृतीय श्रेणीतील ६९ कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी विभागांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पारदर्शक आणि गतिमान कारभाराचा एक भाग म्हणून या बदल्या केल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे. असे असले तरी या बदली प्रक्रियेत दुजाभाव केल्याचा आरोप करून प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सिडकोच्या माध्यमातून हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. विशेषत: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, सागरी मार्ग आदींचा यात प्रामुख्याने समावेश आहे. या प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी घेतला आहे. त्यानुसार गतिमान आणि पारदर्शक कारभारासाठी एकाच विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या तृतीय श्रेणीतील ६९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

बदल्या केलेल्यांत कार्यालयीन सहायक आणि लिपिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्याप्रमाणे शिफाई, सफाई कर्मचाऱ्यांच्यासुद्धा बदल्या केल्या आहेत. असे असले तरी अचानक केलेल्या या विभागांतर्गत बदल्यांमुळे काही कर्मचाऱ्यांत नाराजीचे सूर आहेत. विशेषत: प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांवर यात अन्याय झाल्याची ओरड केली जात आहे, तर अनेक वर्षांपासून एकाच विभागात काम करीत असलेल्या काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांना यातून डावलल्याचा आरोप केला जात आहे.दरम्यान, या बदली प्रक्रियेत काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आहेत. तसेच  व्यवस्थापक (कार्मिक) यांनी बदल्यांसंर्दभात असोसिएशन ला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न केल्यामुळे प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.  याबाबत उद्या व्यवस्थापनासोबत चर्चा करणार असल्याचे सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील आणि प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन चे  अध्यक्ष जे.टी. पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :cidcoसिडको