शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तळोजात कारवाईविरोधात एकवटले प्रकल्पग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 01:43 IST

नावडे गावाजवळील मुंब्रा-कळंबोली मार्गालगत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामावर

पनवेल : नावडे-तळोजा विभागातील प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामावर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी सिडकोचे अतिक्रमण विभागाचे पथक दाखल झाले होते. मात्र, प्रकल्पग्रस्तांचा रोष पाहून पथकाला माघारी फिरावे लागले. कारवाईला विरोध करण्यासाठी प्रकल्पग्रस्त एकत्रित झाल्याने सिडकोने शुक्रवारच्या कारवाईला स्थगिती दिली.नावडे गावाजवळील मुंब्रा-कळंबोली मार्गालगत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामावर कारवाईसाठी शुक्रवारी तारीख निश्चित झाली होती. आमदार बाळाराम पाटील यांचे मूळ गाव नावडे या ठिकाणी ही कारवाई असल्याने बाळाराम पाटील यांनी इतर पक्षाच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.कारवाईला स्थगिती दिल्याचा निरोप वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे दिल्यानंतर पोलिसांनी याबाबत प्रकल्पग्रस्तांना माहिती दिली. त्यानंतर प्रकल्पग्रस्त शांत झाले. या वेळी काँग्रेसनेते महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काशिनाथ पाटील, शिवसेनेचे बबन पाटील, नगरसेवक हरेश केणी, विष्णू जोशी, ज्ञानेश्वर पाटील आदीसह शेकडो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने एकवटल्याने सिडको अधिकाऱ्यांनी थेट तळोजा पोलीस ठाणे गाठले. न्याय हक्कासाठी प्रकल्पग्रस्तांनी सिडको विरोधात लढा देण्याची गरज असल्याचे या वेळी बाळाराम पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते महेंद्र घरत यांनीदेखील प्रकल्पग्रस्तांवर केल्या जाणाºया कारवाईचा विरोध करण्यासाठी एकत्र येऊ, असे स्पष्ट केले. 

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबई