शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांची विनाहेल्मेट घुसखोरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 00:57 IST

‘नो हेल्मेट नो एंट्री’ चा कार्यालयांना विसर, वाहतूक पोलिसांचे नियम धाब्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : दुचाकीस्वारांचे अपघात टाळण्यासाठी तसेच अपघातानंतर प्राण जाऊ नयेत यासाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी शासकीय आणि खासगी कार्यालये, महाविद्यालये आदी ठिकाणी ‘नो हेल्मेट नो एंट्री’ उपक्रम राबविला होता. परंतु आता या उपक्रमाचा कार्यालयांना विसर पडला असून उपक्रम सुरू केलेल्या ठिकाणी दुचाकीस्वारांची विनाहेल्मेट घुसखोरी सुरू आहे. सदर उपक्रम वाहतूक पोलिसांनी पुन्हा राबवावा, अशी मागणी केली जात आहे.नवी मुंबई महापालिका मुख्यालय हे पामबीच मार्गाशेजारी असून मुख्यालयात विविध कामांसाठी दुचाकीने येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथे येणाऱ्यांना पामबीच मार्गाचा वापर करावा लागतो. पामबीच मार्गावरील अपघाताच्या घटना टाळण्यासाठी महापालिका मुख्यालयातही हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमाची दुचाकीस्वारांना माहिती व्हावी यासाठी प्रवेशद्वारावर फलक बसविण्यात आले होते. तसेच हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाईदेखील केली जात होती. परंतु आता या मोहिमेकडे दुर्लक्ष केले जात असून कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर लावण्यात आलेले फलक काढण्यात आले आहेत. ज्या कार्यालयांमध्ये सदर उपक्रम सुरू करण्यात आला होता त्या कार्यालयांमध्ये अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट घुसखोरी करत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला असून सदर उपक्रम वाहतूक पोलिसांनी पुन्हा राबविण्याची मागणी केली जात आहे.

नो हेल्मेट नो एंट्री’ उपक्रम दुचाकीस्वारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियान काळात या उपक्रमाला पुन्हा पुनर्जीवित करण्यात येईल.- पुरुषोत्तम कराड (उपआयुक्त, वाहतूक पोलीस, नवी मुंबई)