शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण थांबवल्याने अल्पवयीन बहिणींनी सोडले घर; गुडगाव मधून पाच मुलींना घेतले ताब्यात

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 12, 2024 16:38 IST

गुन्हे शाखेची कामगिरी

 नवी मुंबई : शिक्षणाची आवड असूनही घरचे शिकू देत नसल्याने तीन अल्पवयीन मुलींनी घर सोडल्याची घटना समोर आली आहे. तर शेजारच्याच दोन मुलींना शिक्षण आवडत नसल्याने त्यांनीही या मुलींसोबत थेट गुडगाव गाठले होते. या पाचही मुलींना पोलिसांनी गुडगाव येथून सुखरूप ताब्यात घेतले आहे. 

तळोजातून एकाच वेळी पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाल्याने पोलिसांनी गांभीर्याने घेतले होते. त्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहायक निरीक्षक नीलम पवार, उपनिरीक्षक शरद भरगुडे, विजय चौधरी, महेंद्र ठाकूर आदींच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे मुलींचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यामध्ये तळोजा येथून त्या खारघर व तिथून बांद्रा ला गेल्याचे दिसून आले. त्यामुळे बांद्रा येथून राज्याबाहेर जाणाऱ्या रेल्वे प्रवास्यांच्या यादी पडताळणीत त्या गुडगावला गेल्याचे समोर आले. त्यांना कोणी फूस लावून नेली असल्यास घातपाताची शक्यता नाकारता येत नव्हती. यामुळे गुन्हे शाखेचे पथक तातडीने गुडगाव येथे पोहचले असता पाचही मुली त्याठिकाणी आढळून आल्या. एका मुलीच्या भावाने त्यांना राहण्यासाठी भाड्याने घर घेऊन दिले होते.

तमन्ना (१४) हिला सात बहिणी असल्याने घरच्यांनी त्यांचे शिक्षण थांबवले होते. परंतु त्यांना शिक्षणाची आवड असल्याने एक महिन्यापासून तमन्नाने सात व पाच वर्षाच्या बहिणीसोबत पळून जायची तयारी चालवली होती. त्यातच शेजारी राहणाऱ्या प्रिया (१६) व संतोषी (१४) यांना शिक्षणाची आवड नसल्याने व घरचे वातावरण चांगले नसल्याने त्या देखील त्यांच्यासोबत पळून जायला तयार झाल्या होत्या. त्यानुसार ३ फेब्रुवारीला पाचही मुलींनी घर सोडून थेट गुडगाव गाठले होते. त्याठिकाणावरून त्यांना ताब्यात घेऊन महिला व बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे.