शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस वाहने होणार जप्त, दहा दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 02:44 IST

कळंबोली स्टील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बंद पडलेली वाहने तसेच त्यांचे सुटे भाग पडून आहेत. त्याचा रहदारीला अडथळा निर्माण होवून वाहतूककोंडी होते.

कळंबोली : कळंबोली स्टील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बंद पडलेली वाहने तसेच त्यांचे सुटे भाग पडून आहेत. त्याचा रहदारीला अडथळा निर्माण होवून वाहतूककोंडी होते. याबाबत पनवेल महानगरपालिका आणि बाजार समितीने ठोस पाऊल उचलले आहे. दहा दिवसांत ही वाहने हटवली नाही तर ती जप्त करून लिलाव करण्याचा इशारा मनपा आयुक्त आणि समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.सर्वात मोठे लोह-पोलाद मार्केट असल्याने कळंबोली स्टील मार्केट परिसरात दररोज हजारो ट्रक, ट्रेलर मालाची चढ-उतार करण्याकरिता येतात. यापैकी बहुतांशी वाहने सर्व्हिस रोडच्या कडेला उभी केली जातात. दोनही बाजूने वाहने उभी करण्यात आल्याने वाहतूककोंडी होते.अंतर्गत रस्त्याबरोबर सर्व्हिस रोडवर बंद पडलेले ट्रक, ट्रेलर मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळे निर्माण होतात. काही वर्षांपूर्वी सिडको, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस आणि लोह पोलाद मार्केटने संयुक्त मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर मात्र अशी मोहीम राबविण्यात आली नाही. अशा वाहनांमुळे मार्केटमध्ये रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.महापालिका, बाजार समितीच्या संयुक्त बैठकीत हा विषय चर्चेला आला होता. त्याशिवाय समितीच्या बैठकीत या वाहनांवर कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला होता. मनपा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे सुध्दा तक्र ारी आल्या होत्या. तसेच बाजार समितीचे चेअरमन गुलाबराव जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास रसाळ यांनी याकामी पुढाकार घेतला. त्यानुसार बाजार समिती आणि पनवेल महापालिकेने संयुक्त पत्रक प्रसिध्द केले आहे. त्यामध्ये बाजार समितीच्या आवारात बेवारस, नादुरुस्त, भंगार अवस्थेतील, खराब झालेली तसेच वापरात नसलेली वाहने उभी करण्यात आलेली आहेत. त्यांचे सुटे भाग सुध्दा अनेक ठिकाणी कित्येक कालावधीपासून पडलेले आहेत.बेवारस वाहने हटवण्यासंदर्भात बाजार समितीचे पदाधिकारी आणि अधिकाºयांसोबत दोन ते तीन बैठका झाल्या आहेत. बंद पडलेली वाहने तसेच त्यांच्या सुट्या भागाचा रहदारीला अडथळा होत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरटीओ, वाहतूक पोलिसांना बरोबर घेवून बाजार समिती आणि महापालिकेकडून पुढील कारवाई केली जाईल. ही समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने ठोस भूमिका घेण्यात आली आहे.- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका