शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कार्यालयामध्ये विजेचा होतोय गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:12 IST

नवी मुंबई महापालिकेने शहरात विविध कार्यालये, शाळा, रुग्णालयाच्या इमारती बांधल्या आहेत. या ठिकाणी विजेची देखील चांगल्या प्रकारे सोय करण्यात आली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहरात विविध कार्यालये, शाळा, रुग्णालयाच्या इमारती बांधल्या आहेत. या ठिकाणी विजेची देखील चांगल्या प्रकारे सोय करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी वापर नसताना व बंद कार्यालयातील देखील विजेवर चालणारी उपकरणे सुरू ठेवण्यात येत असून विजेचा अनाठायी वापर केला जात आहे. या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान देखील होत आहे.नवी मुंबई शहरात नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्याच्या दृष्टीने पालिकेची कार्यालये, समाज मंदिर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, रु ग्णालय, शाळा आदींच्या प्रशस्त इमारती उभारल्या आहेत. या वास्तूंना साजेशी विद्युत सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामधील काही इमारतींमध्ये सोलर सिस्टीमचा वापर केला जात असून अनेक ठिकाणी विजेचा वापर केला जात आहे. विजेच्या कमतरतेमुळे राज्यातील अनेक ग्रामीण भागात लोड शेडिंग केली जात असताना शहरांमधील पालिका कार्यालयांमध्ये विजेचा अनाठायी वापर केला जात आहे. महापालिकेने निर्माण केलेल्या इमारतींमध्ये दिवसा पुरेसा प्रकाश राहावा यासाठी खिडक्यांचा आकार मोठा ठेवण्यात आला आहे. परंतु आवश्यकतानसलेले पंखे, विद्युत दिव्यांसारखी उपकरणे सुरू ठेवली जात आहेत. या इमारतींमधील काही बंदअसलेल्या दालनांमधील तसेच इमारतींच्या वापर नसलेल्या मजल्यावरील देखील पंखे आणि विद्युत दिवे सुरू राहात आहेत.विविध इमारतींमधील खुल्या सभागृहातील देखील विजेची उपकरणे सुरू ठेवण्यात येत असून या सर्व प्रकाराकडे त्या ठिकाणच्या मुख्य अधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष झाले आहे. यामुळे आवश्यकता नसताना महापालिकेच्या माध्यमातूनच विजेचा अनाठायी वापर केला जात असून विजेच्या बिलापोटी महापालिकेला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका