शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाबाहेर बेकायदा पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:53 IST

वाशीतील प्रकार; अपुऱ्या जागेमुळे रुग्ण, नातेवाइकांची वाहने पदपथावर

नवी मुंबई : वाशी येथील पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयाच्या आवारात वाहने पार्किंगची जागा अपुरी असल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाइकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, रुग्णालयाबाहेरील पदपथ आणि रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग करावी लागत आहेत, त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालताना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून, पालिका रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे.नवी मुंबई महापालिकेचे वाशी सेक्टर-१० येथे एकमेव सार्वजनिक रुग्णालय आहे. या रुग्णालयात उपचारासाठी नवी मुंबई तसेच इतर शहरांच्या विविध भागांतून अनेक रु ग्ण येतात. या रु ग्णालयात उपचारासाठी येणाºया रुग्णांची दिवसेंदिवस वाढती गर्दी लक्षात घेत, तसेच पालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा देण्याकरिता पालिका प्रशासनाच्या माध्यमातून नेरुळ आणि ऐरोली येथे अत्याधुनिक आणि दर्जेदार रु ग्णालयाच्या इमारती उभारल्या आहेत; परंतु ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने वाशी येथील सर्वजनिक रुग्णालयावर रु ग्णांचा मोठा भार पडत आहे. वाशी येथील रु ग्णालयाचा काही भाग हिरानंदानी रुग्णालयाला करार करून देण्यात आला असल्याने पालिका रुग्णालयाच्या आवारातील पार्किंगची जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे डॉक्टर, पालिका कर्मचारी, रुग्णवाहिका अशाच वाहनांना रुग्णालयाच्या आवारात पार्किंगसाठी जागा देण्यात येते. रुग्णालयात तपासणीसाठी येणारे रुग्ण आणि रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक यांना वाहने पार्किंगसाठी पालिका रुग्णालयाच्या आवारात जागा नसल्याने प्रवेश देण्यात येत नाही, त्यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांची वाहने रुग्णालयाबाहेरील पदपथ आणि रस्त्याच्या कडेलाच उभी करण्यात येत आहेत. वाशी सेक्टर-१० हा गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. पालिका रुग्णालयाच्या परिसरात शाळा, कॉलेज, नागरीवस्ती असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असते. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच रिक्षा स्टॅन्डही आहे, त्यामुळे गजबजलेल्या परिसरात वाहने रस्ते आणि पदपथावर उभी केल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचण निर्माण होत असून नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. या भागात वाहतूककोंडीची समस्याही उद्भवत आहे. या परिसरात महापालिकेने पे अ‍ॅण्ड पार्कची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही, त्यामुळे रुग्णालयात येणाºया नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालिकेने या वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Parkingपार्किंगhospitalहॉस्पिटल