शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

महापे एमआयडीसीत अनधिकृत झोपड्यांचे पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:33 IST

कारवाईकडे दुर्लक्ष : स्थानिक पुढाऱ्यांच्या अर्थपूर्ण पाठिंब्यामुळे भूमाफियांचा उच्छाद

अनंत पाटील

नवी मुंबई : महापे एमआयडीसी परिसरात बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहेत. भूमाफियांनी मोकळ्या जागा बळकावून त्यावर झोपड्या उभारल्या आहेत. या झोपड्या गरिबांच्या माथी मारल्या जात आहेत. बेकायदा झोपड्यांबरोबरच या परिसरात म्हशींचे तबेलेही वाढले आहेत. तसेच या परिसरात होणाºया रसायनाच्या टँकरमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.

औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून महापालिका कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करते. मात्र आवश्यक पायाभूत सुविधा देण्यात मात्र महापालिकेकडून आकडता हात घेतला जात असल्याच्या उद्योजकांच्या तक्रारी आहेत. याचा परिणाम म्हणून या परिसरातील रस्तेदुरुस्ती, गटर मीटरची कामे एमआयडीसीला करावी लागत आहेत. यातच या परिसरात बेकायदा बांधकामे आणि वाढत्या झोपड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने भूमाफियांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या परिसरातील दहा ते बारा एकर क्षेत्रफळाचा भूखंड गिळंकृत करण्यात आला आहे. व्होेट बँकेसाठी स्थानिक पुढाºयांकडून या बेकायदा झोपड्यांना अभय मिळत असल्याचा आरोप केला जात आहे.महापे ए ब्लॉकमध्ये तर मोकळ्या भूखंडावर थेट म्हशींचे तबेले थाटले आहेत.येथील काही रिकाम्य भूखंडावर अनधिकृत झोपड्या उभारल्या आहेत. या झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्याला असल्याचे दिसून आले आहे. रसायनाने भरलेले ट्रक रस्त्याच्या दुतर्फा आणि मोकळ्या भूखंडावर उभे केले जातात. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे येथील रस्त्यांवर नेहमीच वाहतुकीची कोंडी पाहावयास मिळते. बेकायदा झोपड्यांमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे बोलले जात आहे. या झोपड्या गरीब व कष्टकºयांना भाडेतत्त्वावर दिल्या जात आहेत.महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २000 सालानंतर उभारलेल्या झोपड्यांवर धडक कारवाई करीत एमआयडीसीतील अनेक भूखंड अतिक्रमणमुक्त केले होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर महापालिकेची ही मोहीम थंडावल्याने भूमाफियांनी पुन्हा आपल्या कारवाया सुरू केल्या आहेत. याचा परिणाम म्हणून बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई